भाईंदर : बंद घराचे कडी कोयंडे तोडून घरफोडी करणाऱ्या आरोपींना नवघर पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींन कडून पोलिसांनी एकूण ५,९६,४००/- रुपये किं. चे दागिने जप्त केले आहेत .
मिळालेल्या माहिती नुसार २०१/ओ, साई सरोवर, बिल्डींग, RNP पार्क, भाईदर पुर्व ता. जि. ठाणे इथे राहणारे सतेंद्र अमरपाल सिंग, वय ५१ वर्ष,हे दिनांक ३१/०५/२०२२ रोजी दुपारच्या दरम्यान राहत्या घराला कुलुप लावुन कामानिमित्त बाहेर गेले होते काम संपवून ते पुन्हा पुन्हा घरी परत आल्यावर त्यांना त्यांच्या घराच्या दरवाज्याचे कडीकोयंडा तुटलेला दिसला. त्यावेळी त्यांनी घरात प्रवेश करुन पाहिले असता घरातील लाकडी कपाटातील ड्राव्हर तोडुन त्यात ठेवलेले ७,९२,०००/-रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम २५०००/ रुपये असे एकुण ८,१७,५७६/ रुपये किंमतीचा मुद्देमाल कोणीतरी चोरी करुन नेल्याची खात्री झाल्याने सतेंद्र अमरपाल सिंग यांनी दिलेल्या तक्रारीवरुन नवघर पोलीस ठाणे येथे अज्ञात चोरट्यानं विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
या घटनेमध्ये मोठया प्रमाणात मुद्देमाल चोरीस गेलेला असल्याने सदर ठिकाणी पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०१, सहा. पोलिस आयुक्त, नवघर विभाग यांनी भेट देवुन गुन्ह्याच्या तपासाबाबत सुचना आपल्या पथकास दिल्या होत्या. गुन्ह्याच्या तपासा दरम्यान गुन्हयाच्या घटनास्थळावर तसेच आजुबाजुच्या परिसरात मिळून आलेल्या तांत्रीक माहितीच्या आधारे पोलिसांनी या गुन्ह्यांतील दोन संशयित असल्याचे समजुन आले. सदर गुन्हयाच्या तपासकामी नवघर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने संशईतांबाबत अधिक माहिती प्राप्त करुन आरोपी १) अलोककुमार मुन्ना सिंग, वय २४ वर्ष रा-वसई २) नुर अहमद अजीजउल्ला सलमानी वय-३२ वर्षे यांना पेणकरपाडा, काशिमिरा येथुन ताब्यात घेवून दिनांक ०५/०६/२०२२ अटक केली. तसेच नमुद गुह्यातील त्यांचा तिसरा साथीदार सौरभ देवशरण यादव, वय २४ वर्ष, पत्ता-काशिमिरा यास तो हावडा, पश्चिम बंगाल येथे रेल्वेने जात असतांना अकोला येथे ताब्यात घेवून त्यास दिनांक ०७/०६/२०२२ रोजी अटक केली आहे. सदरआरोपींना पोलीस कोठडी घेवुन त्यांच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपुस करुन त्यांनी चोरी केलेले सोने व चांदीचे दागिने एकुण ५,९६,४००/- रुपये किं. चे दागिने हस्तगत करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी श्री अमीत काळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०१, डॉ. शशीकांत भोसले, सहा. पोलीस आयुक्त, नवघर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. मिलिंद देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवघर पोलीस ठाणे, पोनि/सुशीलकुमार शिंदे (गुन्हे), सपोनि/योगेश काळे, पोउनि/अभिजीत लांडे, पोहवा/भुषण पाटील, पोना/गणेश जावळे, पोशि/संदिप जाधव, पोशि/सुरज घुनावत, पोशि/ओंमकार यादव व पोशि/विनोद जाधव, पोशि/अमीत तडवी यांनी केलेली आहे.
