आचोळे – घरफोडी करणा-या आरोपीतास अटक करुन चोरीस गेलेला ९ लाख ५० हजार रुपयांचा १०० टक्के मुद्देमाल तसेच गुन्हयात वापरलेली पल्सर मोटार सायकल आचोळे पोलीस ठाणे यांनी हस्तगत केला आहे.
मिळालेल्या माहीतीनुसार रश्मी रेसीडेंन्सी, लिंकरोड सारस्वत बँकेजवळ नालासोपारा पुर्व याठीकाणी राहणारे रहिवासी यांच्या फ्लॅटचे दिनांक ०५/०६/२०२२ रोजी दुपारच्या दरम्यान कुणीतरी अज्ञात चोरटयाने दरवाजाचे लॉक तोडुन घरातील सोन्याचे दागीने व रोख रक्कम असे एकुण ९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन नेला होता. त्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आचोळे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता
सदर गुन्हयाच्या तपासकामी आचोळे पोलीस ठाणेच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळाची पाहणी करुन तांत्रीक पुरावे हस्तगत केले तसेच सदर गुन्हयाच्या तपासकामी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली २ तपास पथके तयार करण्यात आली. गोपनीय बातमीदाराचे मार्फतीने मिळालेल्या माहितीच्या आधारे एक पथक गुजराज राज्यामध्ये व एक तपास पथक उत्तरप्रदेशमध्ये रवाना करण्यात आले होते. त्याचप्रमाणे सदर गुन्हयाचा तपासासाठी गुन्हे शाखा युनिट-३ चे पथक देखील रवाना झालेले होते त्यांनी संशईत आरोपी दिलशाद फैयाज शेख, वय ३८ वर्षे, रा. रुम नं ५०१, आस्था बिल्डींग, आचोळे, नालासोपारा पुर्व यास दिनांक १३/०६/२०२२ रोजी ताब्यात घेवून अटक केली होती. आरोपी दिलशाद शेख याच्याकडुन ९ लाख ५० हजार रुपये किंमतीचा गुन्हयात चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्हा करण्यासाठी वापरलेली २५,०००/- रु किं ची मोटार सायकल असा एकुण ९ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी श्री संजयकुमार पाटील, पोलीस उप-आयुक्त परीमंडळ २, वसई, श्री पंकज शिरसाठ, सहाय्यक पोलीस आयुक्त, तुळींज विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली आचोळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री चंद्रकांत सरोदे, श्री सुधीर गवळी, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि. श्री सुधीर थोरात, पोउपनि. श्री बुधवंत लोढे, (अ.टि.सी), युनिट-३ (गुन्हे शाखा), पोहवा. दाईंगडे, नितीन जाधव, शेखर पवार, पोना प्रशांत सावदेकर, संदिप बडगुजर, पोशि अभिजीत नेवारे, बालाजी शिंदे, बालाजी संगमे, ज्ञानेश जोहरे, बंडगर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
