तुळींज : दरम्यान श्रीमती सुप्रिया संजय वाडकर वय ५८ वर्षे, राह – रुम नं. डी०५, महालक्ष्मी अपार्टमेंट, विघ्नहर्ता सोसायटी, गालानगर, नालासोपारा पूर्व, ता. वसई, जि. पालघर यांच्या घरातुन एकूण ३,१४,०००/- रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागीने आणि रोख रक्कम चोरी गेल्याची तक्रार तुळींज पोलीस स्टेशनला नोंदवली असून , तुळींज पोलीस स्टेशनला वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून तुळींज पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळावरील तांत्रिक पुरावे व गुप्त बातमीदारांच्या आधारे नालासोपारा पुर्व येथुन आरोपी प्रथम पंढरीनाथ मुनगेकर वय १९ वर्ष रा.रुम नं ४०७ ए विंग गजानन अपार्टमेंट पाच अंबा नालासोपारा पुर्व यास २४ तासाचे आत ताब्यात घेऊन दिनांक ०४/०९/२०२१ रोजी अटक करुन आरोपीकडुन गुन्हयात चोरीस गेलेले एकुण ३,१२,०००/- रूपये किमतीचे १२४.९३७ ग्रॅम वजनाचे सोन्या चांदीचे दागीने व वेगवेगळया कपनीचे ३ मोबाईल, असे एकूण ३,१२,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करून त्याच्या कडून एकुण २ गुन्हे उघडकीस आणले.
सदरची कामगिरी श्री. संजयकुमार पाटील, पोलीस उपआयुक्त, परि.मंडळ -२, श्री. अमोल मांडवे, सहा.पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली तुळींज पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि. संदेश पालांडे, सपोनि. एम.डी.म्हात्रे, पोउपनि. ज्ञानेश्वर कोकाटे, सहा.पो. उप. निरी. शिवानंद सुतनासे, पोहवा. अनिल शिंदे, पो.ना. आनंद मोरे, उमेश वरठा, शेखर पवार, पो.अं. अशपाक जमादार, छपरीबन, एस डी गडाख व विनायक राऊत यांनी केलेली आहे.
