नायगाव : दिनांक ०९/०७/२०२१ रोजी फिर्यादी यांनी वालीव पोलीस ठाणे येथे खबर दिली की , फिर्यादी यांचे केळीचा पाडा , नायगाव पूर्व येथील चाळीत राहणारी महिला मयत नाव : मेहुबा बिबी साजु शेख हिचा तिच्यासोबत गेले ४ दिवसापासून राहणारा अज्ञात इसमाने ओढणीच्या सहाय्याने गळा आवळुन खुन करून पळुन गेला आहे. अशी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून वालीव पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकारी यांनी लागलीच वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांना सदरचा गुन्हा उघडकीस येण्याचे दृष्टीने सूचना केल्या. घटनास्थळावर मिळालेल्या एका तिकिटाचा आधारावर आरोपीचा भ्रमणध्वनी क्रमांक प्राप्त करून माहिती घेतली असता तो गुन्हा करून बागपत , उत्तरप्रदेश येथे पळुन गेल्याचे तांत्रिक गोष्टींच्या आधारे समोर आले असता वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी लागलीच बागपत उत्तरप्रदेश येथे जाऊन त्यांचे राठोडा गावात सापळा रचला . आरोपीस पोलिसांबाबत चाहूल लागताच त्याने घराशेजारी शेतात पळ काढण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्यास उसाच्या शेतातून ताब्यात घेतले.
सदर संशयितांकडे अधिक चौकशी केली असता माहिती समोर आली कि, आरोपी हा सौदी येथे कंपनीत काम करीत असतांना त्याची बिगो ऍपद्वारे मयताशी ओळख होऊन दोघांमध्ये गेले १ वर्षपासून प्रेम सबंध होते, गेले काही महिन्यांपासून मयत हि आरोपीकडे वेळोवेळी पैशाची मागणी करून आरोपीने इतर कोणाशी लग्न करायचे नाही असा तगादा लावुन मागणी पूर्ण नाही केली तर उत्तरप्रदेश येथे आरोपीचे घरी जाऊन सर्व हकीकत घरच्यांना सांगेन असे म्हणून मयत हि आरोपीस ब्लॅकमेलिंग करत होती, अशी माहिती सांगितली . दिनांक ४/७/२०२१ रोजी आरोपी हा मयत हिस भेटण्याकरिता उत्तरप्रदेश येथून नायगाव येथे आला असता याच वादातुन आरोपीयाने ओढणीच्या सहाय्याने मयत हीच तिचे राहते घरात गळा आवळून खून करून अटक टाळण्यासाठी उत्तरप्रदेश येथे पळून गेला होता. सदर गुन्ह्यात आरोपी नाव: इस्माईल मकसूद खान वय : ३० रा. राठोड , राजस्थान यास अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी श्री. संजयकुमार पाटील ,पोलीस उपआयुक्त परी-२ वसई , श्री. विलास चौगुले , पो.निरी , श्री. राहुलकुमार पाटील, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि , ज्ञानेश फडतरे , संतोष सांगवीकर , पो. अंम. योगेश देशमुख , मनोज मोरे, मुकेश पवार , किरण म्हात्रे , सचिन दोरकर , अनिल सोनावणे, राजेंद्र फड , सतिष गांगुर्डे , विनेश कोकणी , सचिन बलिद , बालाजी गायकवाड , भालचंद्र बागुल , अमोल बर्डे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली .
