विरार : दिनांक २६/०२/२०२२ रोजी दुपारच्या सुमारास मनवेलपाडा, विरार (पू),या ठिकाणी समरजित ऊर्फ समय विक्रमसिंह चौहाण हे ऑफिसमधुन गाडीकडे जात असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांचेजवळ असलेल्या अग्नीशस्त्राने त्याचे डोक्यावर गोळीबार करुन दिवसाढवळया त्याचा निघृण खुन केल्याने विरार पोलीस ठाणे गुन्हा नोद करण्यात आला होता.
सदरच्या गोळीबाराच्या घटनेने वसई विरार परीसरातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने मा.वरीष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे नमुद खुनाच्या गुन्हयाचा तपासासाठी गुन्हे शाखा कक्ष १, २, ३, मध्यवर्ती गुन्हे शाखा तसेच विरार पोलीस ठाणे मार्फत वेगवेगळे पथक तयार करण्यात आले होते. सदर गुन्हयाच्या घटनास्थळी भेट देवून त्या ठिकाणी तात्रिक बाबींचे विश्लेषण करण्यात आले. सदरच्या गुन्हयातील आरोपीची ओळख पटविण्यात मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीसांना यश आले. त्या अनुषंगाने मुंबई, ठाणे, वसई, विरार,मिरारोड या ठिकाणी गोपनीय बातमीदारांकडुन सदर आरोपीताबाबत माहीती प्राप्त करण्यात आली. विश्वसनीय बातमीदारांकडुन आरोपी हा उत्तरप्रदेश येथे पळून गेल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्याने मा. श्री. डॉ. महेश पाटील पोलीस उप आयुक्त (गुन्हे) हे स्वतः सोबत पोनि/प्रमोद बडाख, पोनि/ प्रफुल्ल वाघ व पथक हे उत्तरप्रदेश या ठिकाणी रवाना झाले. त्या ठिकाणी एस.टी.एफ. उत्तरप्रदेश यांचे यांचे वरिष्ठ अधिकारी तसेच वाराणसी जिल्हयाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याशी संपर्क साधुन आरोपींचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवली जात असतांना दिनांक २९/०३/२०२२ रोजी सकाळी चिताईपुर चौक, भिकारीपुर रोड वाराणसी उत्तरप्रदेश येथुन कुख्यात आरोपी १.) राहुल विरेद्र शर्मा ऊर्फ राम, राज्य उत्तर प्रदेश, २) अभिषेक तारकेश्वर सिह ऊर्फ अंकुर राज्य उत्तरप्रदेश. यांना ताब्यात घेण्यात आले असुन त्याचेकडे विचारपुस करता त्यांनी सदर गुन्हयाची कबुली दिली देऊन सदर गुन्हयामध्ये त्यांच्या सोबत मनीष सिह ऊर्फ सोनु तसेच आणखी एक आरोपीत असल्याची माहिती दिली आहे.नमुद गुन्हयातील अटक आरोपी राहुल विरेद्र शर्मा ऊर्फ राम याच्या विरुद्ध यापूर्वी अश्या प्रकारचे अजून चार गुन्ह्याची नोंद असून तो मागील ९ वर्षांपासून फरारी होता.वरील आरोपी यांच्या अटकेची कारवाई हि एस.टी.एफ. वाराणसी व गुन्हे शाखा मिरा भाईदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांनी संयुक्तरित्या केली आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. सदानंद दाते, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. एस. जयकुमार, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. डॉ. महेश पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ -३, श्री. प्रशांत वाधुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. अमोल मांडवे, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. रामचंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली, वपोनि/ वराडे, पो.नि/ दिलीप राख नेम – विरार पोलीस ठाणे गुन्हे शाखेचे पो.नि/ प्रमोद बडाख, पो.नि/ प्रफुल्ल वाघ नेम – विरार पोलीस ठाणे, पो.नि/ अविराज कुराडे, पो.नि/शाहुराज रणवरे, पो.नि/ राहुल राख, पो.नि/ सुजित गुंजकर, सपोनि/ रंजितसिह परदेशी, सपोनि/ कैलास टोकले, सपोनि/ सुहास कांबळे, सपोनि/ जगताप, सपोनि/ आंबवणे, सपोनि/ सरक, सपोनि/ सुर्वे, सपोनि/ सोनवणे, सपोनि/ भगत,सपोनि/ बेंद्रे, सपोनि/ बुराडे, पोउपनिरी/ हितेंद्रे विचारे, पोउपनिरी/ शिवाजी खाडे, पोउपनिरी/ उमेश भागवत, पोउपनिरी/ संदेश राणे, पोउपनिरी/ अभिजित टेलर तसेच गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी उत्कृष्ट रित्या पार पाडली आहे.
