नालासोपारा पुर्व येथील साईदया अपार्टमेंट शॉप नं. ४, क्यु अँड क्यु
बार समोर मोरेगान यातील फिर्यादी त्याचे शॉपच्या समोरील बाकडयावर त्याच्या मित्रासोबत बसले होते.
मागील फुटपाथ वरुन अज्ञात एक इसम फिर्यादी व त्याच्या मित्राच्या दिशेने गोळीबार करुन जखमी केले.
फिर्यादी व त्याच्या मित्राला धारदार हत्याराने व मोठया दगडाने प्रहार
करुन गंभीर जखमी करुन जिवे मारण्याचा प्रयत्न करुन पळुन गेले.
म्हणुन आरोपी विरूद्ध तुळींज पोलीस ठाणे मध्ये गु.र नं. २२५/२०२१ भा.दं.वि. कलम ३००, ३४ सह आर्म एक्ट ३/२५, ४/२५ अन्वये
गुन्हा नोंद करण्यात आला.
गुन्हयाची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकऱ्यांसह गुन्हे शाखा, युनिट-३ विरार चे पथकाने गुन्हयाचे घटनास्थळी तात्काळ भेट देवून गुन्हयाचा तांत्रीक तपास केला आणि गुन्हयातील आरोपी निष्पन्न करुन आरोपी १) वय ३४ वर्ष, रा. तुळीज, २) वय २१ वर्ष, रा. चेंबुर याना गुन्हयात अटक केली.
सदर खुनाचा प्रयत्न आरोपीच्या भावाच्या खुनाच्या बदल्याचे पुर्ववैमनस्यातुन झाला असल्याचे प्राथमीक तपासात निष्पन्न झाले. गुन्ह्याचा पुढील तपास तुळींज पोलीस करीत आहेत.
सदरची कामगीरी श्री. विजयकांत सागर, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. प्रशांत वाघुडे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३ यांचे मार्गदर्शनात गुन्हे शाखा, युनिट-३ विरार चे पोनि/प्रमोद बडाख आणि पथक यांनी केली आहे.
