दिनांक – २९/०९/२०२१ रोजी PLUS कंपनीचे सेल्स मॅनेजर श्री. मनिश वाळेकर. वय – ४५ हे जोगेश्वरी ते अंधेरी असा प्रवास करीत असतांना त्यांनी त्यांच्याकडील ०४ बॅग लोकलच्या वरच्या रॅक वर ठेवल्या होत्या. अंधेरी ला लोकल मधून घाई घाईत उतरत असतांना वाळेकर एक बॅग तिकडेच विसरून अंधेरीला उतरले याबाबत त्यांनी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाणे येथे तक्रार केली. त्यावेळी मुंबई सेंट्रल ते माहीम याठिकाणी गस्ती वर असणारे ए. एच. वाघमारे यांना ती काळ्या रंगाची PLUS नाव असलेली बॅग बेवारस स्थितीत मिळुन आली. वपोनि. इनामदार व पो. शि. ९१० वाघमारे यांनी नमुद बॅग तात्काळ ताब्यात घेवुन त्याची तपासणी केली असता त्यामध्ये क्नोमटेल – ३०० स्पिकर फोन असल्याचे आढळुन आले.सदर बॅग चा शोध घेण्यासाठी वपोनि. श्री. इनामदार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई वाघमारे यांनी गुगल वरुन PLUS कंपनीच्या कार्यालयात संपर्क करून बॅग त्यांच्या कडे असल्याचे सांगितले व सदर बॅग घेण्यासाठी मनिश वाळेकर यांना पोलीस ठाण्यात बोलावुन सदर बॅग दाखवली असता त्यांनी बॅग व त्यातील एकुण – ५०,०००/- रु. किं. चा क्नोमटेल – ३०० स्पिकर फोन पाहुन ओळखुन सदर बॅग त्यांचीच असल्याचे खात्रीने सांगितलेने ती त्यांना सुस्थीतीत ताब्यात देण्यात आलेली असुन प्रवाशी यांनी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाणे यांचेकडुन देण्यात आलेल्या जलद प्रतिसादाबद्दल रेल्वे पोलीसांचे आभार मानले आहेत.
सदर कामगिरी मा. वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. मेहबुब इनामदार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई ए. एच. वाघमारे यांनी नमुद बॅगचे मुळ मालक यांचे शोधार्थ व त्यांना ती परत करण्यात अत्यंत महत्वपुर्ण कामगिरी बजावली आहे.
