दि.05/08/2021 रोजी कल्याण रेल्वे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमूद गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा सेंट्रल क्राईम युनिट हे करीत असताना सदरच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी हा सीएस एम टी येथे येणार असलेबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी सापळा लावून संशयित आरोपीस ताबेत घेऊन नमूद गुन्ह्यात आरोपी नाव सानिध्य दिनेशकुमार दुबे उर्फ डॅनी वय 22 वर्षे राह. बेलापूर यांस अटक करून त्याचेकडे बुद्धिकौशल्याने तपास करून नमूद गुन्ह्यातील मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला आहे व सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे. सदरची कारवाई श्री गजेंद्र पाटील, वपोनी, गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि हेमराज साठे आणि पथकाने केली आहे.
