नालासोपारा (पश्चिम) येशील सायंकाळच्या वेळात यशवंत आयान रेसिडन्सी समोर फिर्यादी महिला (वय-२३) ह्या रस्त्याच्या कडेने मोबाईलवर पायी चालत जात होती. तेवढ्यात २ अनोळखी इसमांनी मोटारसायकल वरून त्या महिलेच्या पाठीमागून येऊन तिच्या हातातील मोबाईल खेचुन चोरी करून नेला. त्याबाबत नालासोपारा पोलीस ठाणे गु र क्र.४२९/२०२० भादंविस कलाम ३९२,३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आली आहे. सदरची घटना दिनांक १०/१२/२०२० रोजी घडली.
सदर गुन्ह्यातील आरोपींचा तांत्रिक तपास करून व गुप्त माहितीदारांकडून माहिती मिळवून आरोपी नामे. १) शाहबाज उर्फ राजा मेहबूब शेख, (वय-२०) राहायला. बांद्रा, मुंबई २)रुफीउद्दीन उर्फ सोनू सफीउद्दीन शेख (वय-१९) राहायला नालासोपारा याना ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला मोबाईल किंमत १४,००० रूपयाचा तसेच सदर आरोपी इसमांनी गुन्ह्यात वापरलेली सुझुकी अँक्सेस मो.सा धारावी मुंबई येथून चोरी केली असून, त्याबाबत शाहूनगर पोलीस ठाणे मुंबई गु. र. क्र. ३२१/२०२० भादवीस कलम ३७९ प्रमाणे गुन्हा नोंद असल्याचे निश्पन्न झाले आहे. आरोपींनी सदर गुन्ह्याव्यतिरिक्त वसई विरार परिसरातील आणखी २ मोबाईल स्नॅचिंग केले बाबत निश्पन्न झाले आहे. तसेच पुढील तपास नालासोपारा पोलीस करीत आहे.
सदरची कारवाई श्री. विजयकांत सागर, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. संजय कुमार पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-२ वसई यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा, वसई कक्ष-२ चे सहायक पोलीस निरीक्षक संतोष गुजर, सहायक पोलीस निरीक्षक. सुहास कांबळे आणि पथक यांनी केली
