विरार : दिनांक २६/०९/२०२१ रोजी विरार पुर्व ला राहणाऱ्या श्रीमती सुषमा सुंदर शेट्टी वय- ४७ या आपल्या मुली व जावई यांच्या बरोबर घरात असतांना त्यांच्यात कौटुंबिक कारणांवरुन वाद झाला त्यावेळी जावई जगदीश दत्ताराम गुरव वय- ३५ याने रागाच्या भरात सुषमा शेट्टी यांचे डोके भिंतीवर आपटले हे बघून त्यांची मुलगी सुप्रिया गुरव हिने आपल्या नवऱ्यास बाजूला ढकलले असता आरोपी ने स्वंयपाक घरातील चाकु आपल्या पत्नीच्या छातीमध्ये भोसकुन तीला ठार मारले व त्यांची सासू सुषमा शेट्टी यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर वारकरून जखमी केले. सदर घटनेबाबत आरोपी विरुध्द विरार पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा केल्यानंतर आरोपी जगदीश गुरव हा फरार झाला होता. त्याचा शोध घेत असताना तो दिनांक २८/०९/२०२१ रोजी सायंकाळचे सुमारास फुलपाडा धरण परिसरात आला असल्याची खात्रीशीर माहीती पोलिसांना मिळाली . त्या बातमीच्या आधारे सापळा रचून आरोपीस पकडून पुढील कारवाई करीता विरार पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून त्यास अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीस मा. न्यायालयाने दिनांक ०४/१०/२०२१ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे .
सदरची कामगिरी श्री. डॉ. महेश पाटील, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), श्री. रामचंद्र देशमुख, सहा.पोलीस आयुक्त, (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, कक्ष -३ चे पोलीस निरीक्षक. प्रमोद बडाख, पो.उप.निरी. शिवाजी खाडे, पो.उप.निरी. उमेश भागवत, सपोफौ.अनिल वेळे, पोहवा. अशोक पाटील, पोना. शंकर शिंदे, मनोज सकपाळ, मुकेश तटकरे, सचिन घेरे, प्रदीप टक्के, सागर बारवकर, पोशि. राकेश पवार यांनी कौशल्यपुर्वक पार पाडली आहे.
