भाईंदर : दिनांक १३/०७/२०२१ रोजी ०२:५१ वाजता विजयकुमार लक्ष्मीनारायण गुप्ता, रा.भाईंदर पुर्व व कमलेश भानाभाई पटेल यांच्या कार च्या काचा फोडून व नुकसान करून त्यामधील २८,०००/- रुपये किंमतीचे दोन कार टेप कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरी झाल्याची तक्रार नवघर पोलीस ठाणे येथे नोंदविली त्यानुसार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यांचा तपासाच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटिकरण कक्ष-१, यांनी घटनास्थळावरून तांत्रिक पुरावे व मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे सदरचे गुन्हे करणारा इसम हा रुपेश वालेतीन डिमेलो रा. वसई असल्याची माहिती पोलिसांना मिळाली . त्याअनुषंगाने त्याच्या बाबत सविस्तर माहिती काढून त्यास दिनांक ०२/०९/२०२१ रोजी वसई येथून ताब्यात घेण्यात आले व त्याच्याकडून चोरलेल्या अल्टो कार, पेनड्राईव्ह, इग्निशन स्विच, वाहनाच्या चाव्या, बँकेचे चेक, पासबुक, स्क्रू ड्रायवर असे मिळून आले. सदर आरोपीस अटक करुन त्याची सखोल विचारपूस केली असता त्याच्याकडून एकूण १,६०,४००/- असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
तसेच दिनांक २९/०७/२०२१ रोजी दुपारी १४:२० वाजताच्या सुमारास दिलीप इस्माईल लोंढे वय ६०, रा. मिरारोड पुर्व यांनी पार्क करून ठेवलेल्या कारची कोणीतरी अज्ञात इसमाने काच फोडून डाव्या सिटवरील प्लास्टीकच्या पिशवीत गुंडाळून ठेवलेले एकुण १,००,०००/- रुपये रोख रक्कम चोरुन नेल्याने काशिमिरा पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदरच्या गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असतांना गुप्त बातमीदाराचे मार्फतीने मिळालेल्या बातमीच्या आधारे १) सॅम्युअल हॅरेल परेरा वय ५२ रा. कासारवडवली, ठाणे व २) सुभाष नागेश गायकवाड वय ३८ रा. दौंड जि. पुणे अशांना दिनांक २४/०९/२०२१ रोजी मिरारोड पुर्व कनाकिया रोड येथून ताब्यात घेवून सदर गुन्हयाच्या बाबतीत विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुली दिली त्यांना सदर गुन्हयात अटक करून गुन्हयात चोरी केलेल्या रकमेपैकी ५०,०००/- रुपये व गुन्हयात वापरेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी डॉ. श्री. महेश पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. रामचंद्र देशमुख, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अविराज कुराडे, सपोनि. किशोर टोपले, पोउपनि. हितेंद्र विचारे, पुष्पराज सुर्वे, सहा.पोउपनी. महादेव पाठक, राजु तांबे, पोहवा संदिप शिंदे, किशोर वाडिले, अर्जुन जाधव, संजय शिंदे, अविनाश गरजे, पोना पुष्पेंद्र थापा, विजय गायकवाड, सचिन सावंत, प्रशांत विसपुते, पोशि विकास राजपुत सर्व नेमणुक गुन्हे प्रकटिकरण शाखा १ काशिमिरा यांनी पार पाडली आहे.
