दि. २२/०७/२०२१ रोजी पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपआयुक्त गुन्हे शाखा व पोलीस उपआयुक्त परिमंडळ-१, यांच्या कनकिया रोड, मिरा रोड येथील नवीन कार्यलयाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी श्री. संजय पांडे , पोलीस महासंचालक यांनी मिरा – भाईंदर, वसई -विरार पोलीस आयुक्तालयाला भेट दिली . मा. पोलीस महासंचालक यांनी नव्याने निर्मिती कार्यालयाची पाहणी केली. त्यानंतर पोलीस महासंचालक यांनी पोलीस आयुक्तालय येथे भेट देवून पोलीस आयुक्तालयातील ‘ई ऑफिस ‘ कार्यप्रणाली कामकाजाचे औपचारिक उद्घाटन करून कार्यलयाचे इतर कामकाजाची पाहणी केली व आयुक्तलयातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेशी संवाद साधला.
भेटीदरम्यान पोलीस महासंचालक यांनी पोलीस आयुक्तालयातील कामकाजाचे व उपक्रमाचे कौतुक करून सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना जनताभिमुख कर्तव्य करण्याबाबत मार्गदर्शन केले.
सदर दौऱ्यावेळी श्री. संजय पांडे , पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यासमवेत श्री. संजीव सिंघल , अपर पोलीस महासंचालक (प्रशासन ) , श्री. सदानंद दाते , पोलीस आयुक्त , श्री. एस. जयकुमार , अपर पोलीस आयुक्त , मिरा भाईंदर, वसई विरार हे उपस्थित होते.
