वरिष्ठाकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २६/०२/२०२१ रोजी सकाळी पोलीस उप निरीक्षक यांना मिळालेल्या गोपणीय माहिती प्रमाणे पथकासह अहमदाबाद मुबंई हायवे रोडवर वर्सेना नाका या ठिकाणी सापळा लावुन थांबविले असता आयशर टेम्पो क्रमांक जीजे-२१/डब्लु/२६६४ मध्ये विमल, रजनीगंधा, तुलसी, व्हि-१ सुगंधीत तंबाखु, बाबा तंबाखु असा एकुण किंमत २०,३५,१२८/- रुपयेचा प्रतिबंधीत गुटखा सुगंधीत तंबाखु मिळुन आला.
प्रतिबंधीत गुटखा व वाहतुकी करण्यासाठी वापरलेला टेम्पो असा एकुण ५२,४०,१२८/- रुपये किमतीचा मुददेमाल सह टेम्पो चालक (१) मोहम्मद अलमीन जब्बार खान, (२) क्लिनर- मोहम्मद जुनैद लियाकत खान यांना ताब्यात घेण्यात आले
आरोपीविरुध्द काशिमीरा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १५८/२०२१ भादवि कलम ३२८, १८८, २७२, २७३ सह अन्न व सुरक्षा आणि मानके अधिनियम कलम ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई श्री. अमित काळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, श्री. विलास सानप, सहा.
पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग, वपोनि/संजय हजारे, काशिमीरा पोस्टे यांचे मार्गदर्शनाखाली काशिमीरा
पोलीस ठाण्याचे पोउपनि/सचीन काशिद, पोउपनि/पंकज किलजे, आणि पथक यांनी केली आहे.
