घाटकोपर : शरीरास घातक व महाराष्ट्रात बंदी असणारा गुटखा तम्बाखू व पानं मसाला पोलिसांनी घाटकोपर येथून जप्त केला.
जीत दीपक जोशी (भानुशाली) वय-२० वर्षे हा बंदी असलेला गुटखा पान मसाला विकत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती त्यावरून पोलिसांनी सदर आरोपीस सापळा लावून त्याला घाटकोपर पश्चिम येथील झोपडपट्टी मधून ताब्यात घेण्यात आले व त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपी कडून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कारवाई साठी त्यास बोरीवली लोहमार्ग पोलिस ठाणे येथे हलविण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस उप-निरीक्षक श्रीकृष्ण चव्हाण व स्टाफ यांनी केली आहे.
