गुंड्याना शह देणाऱ्या आ. राम कदमावरच कारवाई करावी :-डॉ. राजन माकणीकर

Crime News

(पवई पोलीस शिपाई मारहाण प्रकरण)

कर्तव्य बजावत असतांना पोलिसांवर हाथ उचलणार्या कोणत्याही अश्या व्यक्तीला जेरबंद करून धडा शिकवल्याशिवाय सोडू नये व गुंड्याना शह देणाऱ्या आंमदरावरच करावी कारवाई अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी दिली.

भाजपा सरकार सत्तेत आल्या पासून बौद्ध, दिन-दलित, मुस्लिम, पिडीत, महिला, विद्यार्थी व आदिवासी जनतेवर अन्यायाची मोहीम चालू झाली आहे, बलात्कार, मारहाण, गुंडागर्दी चे प्रमाण वाढले असून संविधानाची पायमल्ली होत आहे, कायदा व सुव्यवस्था धोक्यात आलेला आहे.

सरकारी कर्मचारी पासून ते अधिकारी पर्यंत वातावरण भयभीत झाले आहे. पोलिसांचा धाक कमी होऊन पोलिसांवरच हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे आणि हे हल्ले करणारे गुंड भाजप पक्षाचे असल्याचे निष्पन्न होत आहे.

असाच एक प्रकार महाराष्ट्र मुंबई पवई पोलीस ठाण्यात घडला असून 3 भाजपा कार्यकर्त्यांनी कर्तव्यात असलेल्या पोलीस शिपायला रिक्षात डांबून बेदम मार दिला आहे.

ही बाब पोलीस यंत्रणेला शरमेने मान खाली घालवणारि असून अश्या या गुंड्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी आर.पी.आय डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे असेही डॉ. माकणीकर यांनी सांगितले.

पोलिस शिपायांवर हल्ला केलेल्या त्या जात, धन आणि सत्तेचा माज चढलेल्या BJP कार्यकऱ्याला माणुसकीच्या दृष्टीने सोडून द्यावे असा फोन करणाऱ्या आमदार राम कदमांचा तीव्र शब्दात जाहिर निषेध व्यक्त करून पोलिसांच्या समर्थनात RPID उभा असल्याचेही माकनिकर यांनी सांगितले.

आमदार राम कदम अश्या गुंड्याना घेऊन जर राजकारण करत असेल तर लवकरच आमदार साहेबाना आपला घाश्या गुंडाळावा लागेल. पोलिसांवर हल्ले कदापि सहन केले जाणार नाहीत, पोलिसांवर हल्ले करणाऱ्या गुंडांवर विशेष पथक नेमून गुंड व त्यांच्या समर्थकांना चांगला च धडा शिकविण्यात यावा अशी प्रतिक्रिया डॉ माकणीकर यांनी दिली.

पोलीस शिपायाला संरक्षित करून गुंड व त्यांच्या समर्थकांना शासकीय कामात अडथळा करण्याचा गुन्हा नोंदऊन आंमंदार राम कदमावरही कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी सुद्धा डॉ. माकणीकर, कॅप्टन श्रावण गायकवाड व राजेश पिल्ले यांनी केली आहे.

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply