पालघर : पोलीस अधीक्षक पालघर मा.श्री. दत्तात्रय शिंदे, यांना दिनांक १/१२/२०२१ यावेळी गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली कि गुजरात बाजुकडून येणारा ट्रक कंटेनर यामध्ये गोमांस असून तो ट्रक मुंबई बाजूकडे जात आहे अशी माहिती मिळाल्यावर त्यांनी पोलीस उप निरीक्षक श्री. आशिष पाटील, स्थानिक गुन्हे शाखा बोईसर युनिट यांना त्याबाबत शहानिशा करण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे पोलीस उप निरीक्षक श्री. आशिष पाटील, यांनी पशु वैद्यकिय अधिकारी ग्रामीण रुग्णालय, कासा श्री. धनंजय धुम व पंच यांचेसह अहमदाबाद-मुंबई महामार्गावरील चारोटी नाका येथील हिमाचल-पंजाब ढाबासमोर सापळा रचून ट्रक थांबवला त्यानंतर पंचनामा करुन पंचासमक्ष पशु वैद्यकिय अधिकारीग्रामीण रुग्णालय, कासा यांचेमार्फतीने मटणाचे नमूने काढुन ते तपासणीसाठी न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा, कलीना येथे पाठविले होते.याबद्दल ताबडतोब अहवाल मिळावा म्हणून पोलीस अधिक्षक यांनी स्वतःसंचालक, न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा, कलीना यांचेशी चर्चा व पत्र पाठवून विनंती केली होती. न्यायवैज्ञानिक प्रयोग शाळेकडुन मिळालेल्या अहवाल नुसार सिद्ध झाले कि हे गोमांसच आहे.
सदर प्रकरणी चौकशीअंती , मोटार ट्रक मालक व त्याचे अन्य साथीदार यांनी आपसांत संगणमताने कोणताही शासकीय परवाना जवळ नसताना ट्रकमध्ये सुमारे २१०१८ किलोग्रॅम वजनाचे सुमारे २०,६०,८२६/-रुपये किंमतीचे गोवशांचे मांस अनाधिकृतरित्या कोठेतरी कत्तल खाण्यामध्ये जनावरांची निर्दयीपणे कत्तल करुन महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा कलमांचे विनीर्दीष्ट केलेल्या ठिकाणी सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र धारण न करता निर्दयी पध्दतीचा वापर करुन गोवशांची हत्या करुन त्यांचे मांस तळोजा येथे घेवून जाण्यासाठी सरकारी यंत्रणेस बफेलाबिफ (म्हैशीचे मटण) असल्याचे खोटी माहिती देवुन त्याचे ई-वे बिल तयार करुन ते ई वे बिल खोटे असल्याचे माहित असतांना ते खरे आहे सांगुन सरकारी यंत्रणेची फसवणूक केली असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याबाबत दिनांक.०४/१२/२०२१ रोजी कासा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच सदर गुन्ह्यातील ४ आरोपींना अटक करून सुमारे २१०१८ किलोग्रॅम वजनाचे सुमारे २०,६०,८२६/-रुपये किंमतीचे गोवशांचे मांस व २०,००,०००/- रुपये किंमतीचा मोटार ट्रक असा एकुण- ४०,६०,८२६/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.नमुद गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक श्री. आशिष पाटील, स्थानिक गुन्हे शाखा बोईसर युनिट हे करीत आहे.
सदरची कामगिरी श्री. दत्तात्रय शिंदे, पोलीस अधीक्षक पालघर, यांचे सुचनेप्रमाणे श्री. प्रकाश गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, यांचे मार्गदर्शनाखाली पोनि श्री. अजय वसावे, स्थानिक गुन्हे शाखा पालघर, पोलीस उप निरीक्षक श्री. आशिष पाटील, स्थानिक गुन्हे शाखा बोईसर युनिट, व स्थानिक गुन्हे शाखा बोईसर युनिटचे पोलीस अमंलदार यांनी केली आहे.
