गांजा व प्रतिबंधित मॅक्सॉफ सिरप औषध विक्री करतांना एक आरोपीस तलवारी सह अटक . काशिमीरा पोलीस स्टेशन ची कारवाई .

Crime News

मिरारोड : सपोनि. महेंद्र भामरे , नेम . काशिमीरा पोलीस ठाणे यांना दिनांक २६/०६/२०२१ रोजी गोपनीय माहिती मिळाली की ,’आरोग्य केंद्राचे जवळ , नीलकमल नाका काशिमीरा , मिरारोड (पु ) येथे एक इसम त्याच्या जवळ तलवारी सारखे घटक शस्त्र घेवून वावरत आहे. मिळालेल्या बातमीच्या आधारे सपोनि /महेंद्र भामरे यांनी सदर ठिकाणी त्यांच्या पथकासह सफळा रचून छापा घातला असता नमूद ठिकाणी काळ्या रंगाची स्विफ्ट कार क्र . एम. एच . ०१, ए २५६५ हिच्यामध्ये संशयीत इसम नाव : महजर रशीद शेख , वय : ३४ रा. मिरारोड (पु ) याला ताब्यात घेतले असता . त्याच्याकडे १) २५. इंच लांबीची एक तलवार २) १० ग्राम वजनाच्या ०८ गांजाच्या पुडया ३)प्रतिबंधित मॅक्सॉफ सिरप ओषधांच्या ५ बाटल्या अशा वस्तू जवळ बाळगतांना व विक्री करताना मिळून आल्याने त्याच्याकडून १,५६,१९०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन सदर प्रकरणी काशिमीरा पोलीस येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदर गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्हयाचा अधिक तपास सपोनि. श्री महेंद्र भामरे हे करीत आहेत .

सदरची कामगिरी श्री. अमीत काळे ,पोलीस उपआयुक्त ,परिमंडळ -१,श्री. विलास सानप ,सहायक पोलीस आयुक्त , मिरारोड विभाग , यांचे मार्गदर्शनाखाली श्री . संजय हजारे   श्री. विजय पवार  पोनि. (गुन्हे),काशिमीरा गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि. महेंद्र भामरे , प्रशांत गांगुर्डे , पोउनि . जावेद मुल्ला,पोना.सुरेश शिंदे , पोशि. संतोष तायडे ,पोशि. शरद नलावडे , पोशि. स्वप्नील मोहिले , पोशि. सुधीर खोत ,पोशि. सचिन मोरे यांनी केली .

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply