घोडबंदर : दि. ०२/०९/२०२१ रोजी १२:०० वाजताच्या सुमारास घोडबंदर रोड कासार वडवली प्रशांत कॉर्नरच्या, समोरील सर्व्हिस रोडवर दोन इसम गांजा हा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा वागळे घटक-५ चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विकास घोडके यांना मिळाली होती. मा. वरिष्ठांचे सुचना व मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा वागळे घटक-५ चे पथकाने सदर ठिकाणी सापळा रचुन इसम १) प्रशांत भगवान नायक, वय ३० वर्षे, राह. ओरिसा, २) अरमान चिंधा पटेल, वय ३८ वर्षे, राह. बदलापुर यांना ताब्यात घेवुन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ३४ किलो १७० ग्रॅम वजनाचा ८,५४,८३० रूपये किंमतीचा गांजा हा आमली पदार्थ मिळुन आला. सदरचा गांजा हा आरोपींना ओरिसा राज्यातुन आणला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असुन पोलीस सदरचा गांजा कोणाकडुन आणला व कोणास विक्री करणार होते याचा अधिक तपास करीत आहेत.सदर इसमाविरूध्द पो. हवा. न्हावळदे यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर कासार वडवली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे करीत आहेत.
सदरची कारवाई मा.वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा वागळे युनिट-५, ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विकास घोडके, पोलीस निरीक्षक अरूण क्षिरसागर, सहा.पो.निरिक्षक अनिल सुरवसे, पोउपनिरि. बाबु चव्हाण, स.फौ. शरद तावडे, स.फौ. देविदास जाधव, पो.हवा. जगदीश व्हावळदे, पो.हवा.राजेंद्र गायकवाड, पो.हवा. मनोज पवार, पो. हवा. शशिकांत नागपुरे, म.पो.हवा. कल्पना तावरे, पो.कॉ. सागर सुरळकर, चालक यश यादव, म.पो.कॉ. सुजाता शेलार. तांत्रिक विश्लेषण तज्ञ मोहन भानुशाली या पथकाने केली आहे.
