काशिमिरा घोडबंदर चिंचबादेवी मंदिरासमोर एक ईसम अंमली पदार्थाची विक्री करण्याकरिता येणार असल्याची गोपनीय बातमी काशिमिरा पोलीस ठाण्याला मिळाली.
सदरची घटना दिनांक १८/०१/२०२१ रोजी सायंकाळी घडली. मिळालेल्या बातमीवरून काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक. संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक. विजय पवार व त्यांच्या पथकाने नमूद ठिकाणी सापळा लावून, आरोपी (वय-२४ वर्ष) राहायला. डी-मार्ट जवळ नालासोपारा (पुर्व) याला ऍक्टिवा स्कूटी सह ताब्यात घेऊन त्याच्याकडून तब्बल १० किलो ४०० ग्रॅम गांजा किंमत ३,५२,५००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदर आरोपी विरोधात काशिमीरा पोलीस ठाण्यात गु.र.नं ५५/२०२१ गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २०(ब), ii (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचे कामगिरी श्री. अमित काळे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१ श्री. विलास सानप, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग, काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय पवार तसेच पथक यांनी केली आहे.
