मुंबई सेंट्रल : दिनांक – ०६/०९/२०२१ रोजी पारस अशोक शाह. वय – ३६ वर्षे, राह. घाटकोपर (पश्चिम) हे दादर रेल्वे स्टेशन फलाट मोठ्या ब्रीजवरुन उतरत असताना प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेवुन मुज्जमील बादशाह खान. राह. वाशी, नवी मुंबई. याने पारस शाह यांच्या पँटच्या खिशातील १५,०००/- रुपये किं. चा एक नोट-५ प्रो, लबाडीने नकळत चोरी करुन पळुन जात असताना शाह यांच्या लक्षात आल्याने त्यांनी मोठमोठयाने चोर-चोर असा आरडा – ओरडा केला. त्याच वेळी फलाटावर गस्त करणाऱ्या महिला पोलीस अंमलदार व साध्या वेषात गस्त करणारे पोलीस अंमलदार यांनी पाठलाग करुन आरोपीस ताब्यात घेतले
आरोपीची दोन पंचा समक्ष अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीत वरील नमुद गुन्ह्यातील चोरीस गेला मोबाईल फोन मिळुन आला, सदर आरोपी विरुद्ध शहा यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वरिल प्रमाणे मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन नमुद गुन्ह्यात आरोपीस अटक करण्यात आलेली आहे.
सदर कामगिरी मा. वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. मेहबुब इनामदार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक – श्री. एस. जे. कदम, पो. हवा. डी. जी. गोपाळे., पो. हवा. डब्ल्यु. ए. शेख, पो. हवा. एन. वाय. खाडे., पो. हवा. व्ही. झेड. आखाडे, मपोना. यु. एस. पेडणेकर, पो. ना. एस. एस. कांबळे, पो.शि. ए.एन. मराळ, पो.शि. व्ही. बी. गोपाळ, पो. शि. पी. आर. होनमाने यांनी नमुद गुन्ह्याचे तपासात अत्यंत महत्वपुर्ण कामगिरी बजावली आहे.
