नालासोपारा : तुळींज पोलिसांनी ४ वर्षांपासून खून करून फरार असलेल्या आरोपीस दिनांक २०/५/२०२२ रोजी अटक केली आहे. अधिक माहितीनुसार राजबहादुर रामलाल पटेल वय ३७ धंदा-कार हे दिनांक ०८/११/२०१८ रोजी रात्री आपली कार पार्कीगमध्ये पार्क करुन घरी जात असताना संतोष भुवन, नालासोपारा पुर्व येथे आरोपी सचिन सुनील उपाध्याय याने त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते पण पटेल यांनी पैसे देण्यास मनाई केली होती याचा राग धरून आरोपीने राजबहादुर पटेल यांचे डोक्यावर लाकडी दांडक्याने फटका मारला असता त्यांचे डोक्यास गंभीर दुखापत झाली मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता त्यांच्यावर जे. जे. हॉस्पीटल, मुंबई येथे औषधोपचार सुरु असताना दिनांक ११/११/२०१८ रोजी दुपारी . ते मयत झाले होते. सदर बाबत त्यांची पत्नी उर्वशा रामबहादुर पटेल वय ३५, रा. मारुती चाळ, नालासोपारा पुर्व यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दि. १२/११/२०१८ रोजी तुळींज पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा केल्यापासून यातील आरोपी सचिन सुनिल उपाध्याय हा मागील ४ वर्षापासून फरार झालेला असतांना गुन्हे शाखा कक्ष १, काशिमीरा यांच्या मार्फत सदर गुन्हयाचा समांतर तपास चालू ठेवला होता . आरोपीबाबत बातमीदाराचे मार्फत मिळालेल्या माहितीवरुन आरोपी सचिन सुनील उपाध्याय यास शोधण्यासाठी गुन्हे शाखेचे अधिकारी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली वाराणसी, उत्तर प्रदेश येथे रवाना झाले होते. वाराणसी येथे स्थानिक एस. टी. एफ. यांची मदत घेवून सलग सात दिवस अथक परिश्रम करुन आरोपी यास राज्य उत्तरप्रदेश येथून दिनांक २०/०५/२०२२ रोजी ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. आरोपी हा तब्बल ४ वर्ष फरार होता तरी अत्यंत कौशल्य पुर्वक तुळींज पोलिसांनी याचा शोध घेतला.
सदरची कामगिरी डॉ. श्री महेश पाटील, पोलीस उपआयुक्त, (गुन्हे), श्री अमोल मांडवे, सहा. पोलीस आयुक्त, (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष १ चे पो.निरी. अविराज कुराडे, सपोनि. पुष्पराज सुर्वे, स.फौ. संदिप शिंदे, किशोर वाडीले, पो.हवा./पुर्षेद्र थापा, अविनाश गर्जे, पो.शि./विकास राजपुत, सुमीत जाधव यांनी केलेली आहे.
