मिरा रोड : अमेरिकन मॉडेल चा २००३ मध्ये अपहरण करून खून करण्याऱ्या आरोपी विपुल पटेल यास युरोपमधून इंटरपोलच्या मदतीने अटक करण्यात आली आहे. अधिक माहीतीनुसार २००३ मध्ये लिओन स्वीडेस्की वय : ३३ वर्ष हिचे ८ फेब्रुवारी २००३ रोजी मुंबई विमानतळावरून अपहरण करून तिची हत्या करण्यात आली होती. काशीमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत महामार्गालगत तिचा मृतदेह पोलिसांना सापडला होता .सदर घटनेने एकच खळबळ उडाली होती.अमेरिकन सरकारने या हत्येची गंभीर दखल घेऊन आरोपीस लवकरात लवकर पकडण्यासाठी एफबीआयचे एक पथक त्यावेळी भारतात पाठवण्यात आले होते. पोलिसांनी या खुनाच्या दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे लिओन स्वीडेस्की हीचा प्रियकर जो अनिवासी भारतीय आहे प्रग्नेंश देसाई व विपुल पटेल या दोघांना अटक केली होती व यातील दोन आरोपी फरार होते . हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्यात आल्यामुळे याचा निकाल एका वर्षात लागला होता लागला होता परंतु या मध्ये दोन्ही आरोपीची निर्दोष सुटका करण्यात आली होती.
अमेरिकन सरकारने या गुन्हयांची गंभीर दखल घेत या गुन्ह्यांतील मुख्य आरोपी प्रग्नेंश देसाई याला बडोद्यातून ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करण्यात आले होते पण त्याचा साथीदार हा त्यावेळी फरार होता. याच दरम्यान विपुल पटेल हा इंग्लड मध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने त्यांनी इंटरपोलची मदत घेऊन पटेल यास प्राग विमानतळावर ताब्यात घेतले आहे. आरोपीला भारतात आणण्यासाठी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त अमित काळे , काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे सह पथक रवाना झाले व दिनांक २७/०५/२०२२ रोजी आरोपीस मायदेशी आणण्यात आले आहे.
