नालासोपारा : भांडणाचा राग मनात धरुन खुन करुन ८ वर्ष फरार असलेल्या मुख्य आरोपीला उत्तरप्रदेश राज्यातुन अटक करण्यात गुन्हे शाखा – कक्ष २, वसई यांना यश.सविस्तर माहिती अशी कि चंद्रशेखर रामसागर गुप्ता वय ३० वर्ष रा. केशव अपार्टमेंट, रुम नं २०५, वालईपाडा रोड, संतोषभवन, नालासोपारा पुर्व दिनांक १८/३/२०१६ रोजी यांनी तुळींज पोलीस ठाणे येथे त्यांचा मयत भाऊ सुभाषचंद उर्फ भालू रामसागर गुप्ता वय २१ वर्ष याचा भांडणाचा राग मनात धरुन नायलॉन रस्सीने गळा आवळुन त्याला जिवे ठार मारुन त्याचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या ईरादयाने गोणीत भरुन त्याच्या अंगावर असलेल्या सोन्याची चैन व हाताच्या बोटातील सोन्याची अंगठी व मोटारसायकल घेऊन पळून गेलेल्या आरोपी १) शिवाभैया २) रवि श्यामवीर डांगुर ३) अभिजित मिश्रा उर्फ कडा उर्फ सचिन ४) कृष्णा कमलेश दुबे याच्याविरुद्ध तक्रार दिल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मिरा-भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील विविध गंभीर गुन्हयांतील पाहीजे व फरार निष्पन्न परंतु नजेराआड असणारे आरोपी यांचा शोध घेवून अटक करण्याबाबत पोलिसांना वरीष्ठांनी सुचना व मार्गदर्शन केले होते. वरील गुन्हयातील आरोपींपैकी १ विधीसंघर्षग्रस्त बालक व २ आरोपी यांना अटक करण्यात आली होती यातील शिवाभैया हा मुख्य आरोपी असून तो फरार होता हे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यावेळी मयत याचा भाऊ तसेच इतर साक्षीदारांच्या भेट घेऊन सदर माहीतीव्दारे तपास करुन पाहीजे आरोपी हा रा. मजरा चिल्लीमल राजापुर, जिल्हा – चित्रकुट, राज्य – उत्तरप्रदेश येथील राहणारा असुन त्याच्या हातावर असलेल्या टॅटुचे वर्णन आणि बरेच वर्षापुर्वीचा जुना अस्पष्ट फोटो प्राप्त करण्यात आला. मिळालेल्या माहीतीच्या अनुषंगाने नमुद पाहीजे आरोपीच्या मिळालेल्या पत्यावर गुप्त बातमीदारांकरवी आरोपीचा फोटो आणि त्याच्या हातावरील टॅटुच्या वर्णनावरून शोध चालू झाला. पोलिसांनी गुप्त बातमीदारांकडुन प्राप्त जुन्या फोटो आणि टॅटुचे वर्णनाशी मिळता-जुळता व्यक्ती मजरा चिल्लीमल, ता. राजापुर, जिल्हा – चित्रकुट, राज्य- उत्तरप्रदेश परीसरात वास्तव्यास असल्याची माहीती प्राप्त झाल्याने तात्काळ तपास पथक चित्रकुट, राज्य- उत्तरप्रदेश येथे रवाना करुन आरोपीस दिनांक २७/०८/२०२३ रोजी ताब्यात घेतले असून आरोपी शिवबाबु उर्फ शिवाभैया जगतपाल निषाद वय – २० वर्ष, रा.- कलेक्टर पुर्वा मजरा चिल्लीमल, ता. राजापुर, जिल्हा – चित्रकुट, राज्य – उत्तरप्रदेश याने ८ वर्षापुवी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यास पोलीसांनी अथक परिश्रम करून अटक केली आहे.
सदरची कामगिरी मा.श्री अविनाश अंबुरे पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मा. श्री. अमोल मांडवे सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा – २ वसई युनीटचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, स.पो.नि. सुहास कांबळे, सागर शिंदे, सहा. फौज. रमेश भोसले, संजय नवले, पोहवा / प्रफुल्ल पाटील, पो.हवा. चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी, रमेश आलदर, दादा आडके, सुधीर नरळे, पो.ना. प्रशांतकुमार ठाकुर, पो.अं. अमोल कोरे, सर्व नेम- गुन्हे शाखा – २ वसई, तसेच पो.उप निरी. राजेश कुमार राय, आरक्षी / महेंद्रकुमार नेम- सरधुवा पोलीस ठाणे यांनी केली आहे.
