दिनांक : ३१/०७/२०२१ रोजी मुख्य नियंत्रण कक्षाकडून संदेश प्राप्त झाला कि अंधेरी पूर्व येथील फुटपाथ वरील झोपडपट्टी च्या ठिकाणी एक महिला बेशुद्ध अवस्थेत पडलेली आहे. सदर माहिती च्या आधारे गुन्ह्याच्या ठिकाणी पर्यवेक्षक पोनि कुलकर्णी , मा. पोउनि टी . पवार, परि पोउपनि यादव, पोना गावित यांनी घटनास्थळी पाहणी केली असता तेथे बेशुद्द पडलेली महिला नाव: अंजु लहू पवार वय : ४० रा. कच्चेझोपड्पट्टी , सारीपुत नगर, अंधेरी पूर्व दिसून आली तिला तात्काळ उपचारकरिता कुपर रुग्णालयात दाखल केले असता तेथिल डॉ. महिलेस मृत घोषित केले. सदर ठिकाणी महिलेची बहीण श्रीमती पार्वती राजा भोईर हिच्या समक्ष पंचनामा करण्यात आला असता मयत महिलेच्या अंगावर ताज्या व जुन्या माराच्या जखमा दिसून आल्याने तिचा खून झाल्याचा तिच्या बहिणीकडून संशय व्यक्त करण्यात आला. तसेच डॉक्टरांनी देखील यास पुष्टी दिली त्यानुसार श्रीमती पार्वती भोईर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ आरोपीचा शोध घेण्यास सुरवात झाली सदर गुन्हयातील आरोपी बाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसताना कौशल्यपूर्ण तपास करून आरोपीचा मोबाईल नंबर व त्याचे छायाचित्रं प्राप्त करण्यात आले, त्यांच्यात मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१०, मुंबई येथे कार्यरत असलेले पो शि . चौगुले , पोना . पिसाळ यांच्याकडून आरोपीचे मोबाईलचे लोकेशन उपलब्ध करून आरोपीचा तपास चालू केला असता आरोपी हा कमल अमरोही स्टुडिओच्या जवळ , पवई कडे जाणाऱ्या मार्गावर , अंधेरी पूर्व येथे असल्याबाबत माहिती मिळाली असता सदर ठिकाणी पथकाने जावून पाहणी केली असता एक इसम हा स्टुडिओच्या भिंतीजवळ बसलेला दिसुन आला. त्याला त्याचे नाव विचारले असता तो पळून जाण्याच्या प्रयत्न करू लागला . त्यावेळी तपास पथकाने त्यास अटकाव करून शिताफीने पकडले व त्याचे नाव विचारले असता त्याचे त्याचे नाव श्याम असल्याचे सांगितले. तसेच त्याचा चेहरा हा उपलब्ध असलेल्या छायाचित्राशी मिळताजुळता असल्याचे दिसून आले. आरोपीस ताब्यात घेवून पोलीस ठाणे येथे आणून त्याची विचारपूस केली असता सदर गुन्हा त्यानेच केले असल्याचे उघडकीस आले असून त्यास अटक करण्यात आली आहे.
सदर ची कामगिरी वपोनि. जगदीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली , दहशतवाद विरोधी पथकाचे अधिकारी पोउनि. अण्णा ठोंबरे ,तडीपार पथकाचे अधिकारी पोउनि ज्ञानदेव पवार ,व गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोउनि . विजय आचरेकर, व पोना सावंत , पोह . बांदिवडेकर , पो. शि . गोसावी , पोना . सोनावणे, पोना. नौगन , पोना . जाधव , पो. शि . राजभोज यांनी केली.
