उत्तरप्रदेश : खुनाच्या गुन्हयात फरार (प्रत्येकी ५०,०००/- रुपयांचे इनामी असलेले) गुन्हेगार पोलीसांचे जाळयात गुन्हे शाखा युनिट ०१ काशिमीरा व उत्तरप्रदेश वाराणसी एस.टी.एफ. यांना यश. अधिक माहितीनुसार वाराणसी राज्य उत्तरप्रदेशचे एस. टी. एफ चे पोलीस निरीक्षक अमित श्रीवास्तव, पोलीस निरीक्षक अतुल कुमार सिंह व त्यांच्या पथकाने येऊन गुन्हे शाखा युनिट ०१ काशिमीरा कार्यालय येथे हजर राहून लेखी रिपोर्टाने कळविले कि, मेहरनगर पोलीस ठाणे, जिल्हा आजमगड, राज्य – उत्तरप्रदेश, येथे दाखल खुनाच्या गुन्हयातील फरार आरोपी १) रामविलास उर्फ बैलास शंकर यादव, वय-५५ वर्षे, २ ) दिनेश उर्फ गोलू रामविलास यादव, वय-१८ वर्षे, ३) अनिल सुभाष यादव, वय-२० वर्षे, ४) कमलेश मार्कंडेय यादव, सर्व आरोपी रा. ग्राम मालपार, थाना मेहरनगर, जिल्हा आजमगड, राज्य उत्तरप्रदेश. याच्या नावाचे दिनांक २५/०८/२०२३ रोजी मा. सी.जी.एम कोर्ट जिल्हा न्यायालय आजमगड, राज्य उत्तर प्रदेश यांनी अटक वारंट जारी केले होते व त्याचप्रमाणे दिनांक २९/०८/२०२३ रोजी मा. पोलीस महानिरीक्षक, आजमगड, राज्य – उ.प्र यांनी सदर गुन्ह्यातील आरोपी यांची माहीती देणान्यासाठी व अटक करण्यासाठी प्रत्येकी ५०,०००/- रुपयांचे इनाम घोषीत केलेले होत त्या अनुषंगाने उत्तरप्रदेश वाराणसी पोलीस पथक दाखल झाले होते.
गुन्हयांची सविस्तर माहिती अशी कि, सन २००१ मध्ये वरील गुन्ह्यात पाहीजे आरोपी रामविलास यादव याचा मोठा भाऊ मयत मार्कंडेय यादव याला आरोपीच्या गावातील अवधेश यादव व इतर यांनी ठार केल्याच्या आरोपावरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु सदर गुन्ह्यात पुढे जाऊन अवधेश यादव याचे नाव सदर गुन्ह्यातुन काढण्यात आले याचा राग मनात धरुन सन २०१९ मध्ये मयत मार्कंडेय यादव यांचा मुलगा सतीश यादव, व पाहीजे आरोपी रामविलास यादव, अनिल यादव व इतर यांनी आवधेश यादव यास ठार मारले होते. त्यानंतर दि. २१/०२/२०२३ रोजी सन २०१९ मध्ये ठार मारलेले अवधेश यादव घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार दुलारे यादव याला वरीलआरोपीनि ठार मारले या वरून मेहरनगर पोलीस ठाणे, जिल्हा आजमगड, राज्य – उत्तरप्रदेश, येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपी अनिल यादव याचे मोबाईल लोकेशन मिरा भाईंदर परिसरात येत असल्याने विनंती करुन पोलीस मदत मागीतल्याने युनिट – १ चे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांनी स.पो.नि.प्रशांत गांगुर्डे, पो. हवा. पुष्पेंद्र थापा, सुधीर खोत व पो. अं. सनी सुर्यवंशी यांना सांगून उत्तरप्रदेश एस.टी.एफ. पथकाबरोबर सदर आरोपी यांना ताब्यात घेण्यासाठी रवाना करण्यात आले होते. तांत्रीक विश्लेषण वरुन वर नमुदपैकी १) रामविलास उर्फ बैलास शंकर यादव, २) दिनेश उर्फ गोलू रामविलास यादव, ३) अनिल सुभाष यादव, वय – २० वर्षे, यांना काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीतून ताब्यात घेण्यात आले व पुढील कार्यवाही साठी सदर पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगीरी मिरा-भाईदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे मा. श्री. अविनाश अंबुरे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, मा. श्री. अमोल मांडवे, सहा. पोलीस आयुक्त सो, गुन्हे शाखा, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष १ काशिमीरा येथील पो. नि. अविराज कुराडे, स. पो. नि. प्रशांत गांगुर्डे पो. हवा. पुष्पेंद्र थापा, समीर यादव, सुधिर खोत, पो. अं. सनी सुर्यवंशी तसेच उत्तरप्रदेशचे एस. टी. एफ चे पोलीस निरीक्षक अमित श्रीवास्तव, पोलीस निरीक्षक अतुल कुमार सिंह, पो. उ. निरी अंगद यादव, पोलीस हवालदार रवि शंकर यादव, वैजनाथ राम, धनंजय श्रिवास्तव, अरविंद सिंह, राहुल सिंह, विनय मौर्या यांनी केली आहे.
