अँटॉपहील :दिनांक ३०/०९/२०२१ रोजी सकाळी ०७:३० वा. पुर्वी संतोष आनंदराव जाधव, वय २७ यांना सी.जी.एस.कॉलनी,फुटपाथवर एक ३० ते ४० वर्षे वयोगटातील पुरुषाचा मृतदेह ज्याचे हातपाय तोडलेले, मुंडके नसलेले, अर्धवट जळालेल्या स्थितीत त्या ठिकाणी दिसून आला. त्यांनी तात्काळ पोलिसांना बोलावून सदर घटनेबाबत अँटॉपहील पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता .
सदर गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटीकरण कक्षामार्फत चालु होता. सदर तपासा दरम्यान तांत्रीक माहितीच्या आधारे गुन्हयातील संशयीत आरोपींचा शोध घेताना खुनातील आरोपी १) एक पुरुष वय – ४५ वर्षे २) एक महिला वय – ३५ वर्षे याना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता सदर गुन्हा त्यांनीच केल्याचे पोलीस तपासदरम्यान कबूल केले यावरून आरोपीना अटक करण्यात आली व न्यायालय मुंबई यांचे समोर हजर केले असता आरोपीना दि. १४/१०/२०२१ रोजी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तसेच गुन्हयातील मयत इसमाचा देखील तांत्रीक तपासाच्या आधारे शोध घेवुन त्याची ओळख पटवण्यात आली आहे .
सदरची यशस्वी कामगिरी मा.पोलीस सह आयुक्त(गुन्हे), श्री मिलिंद भारंबे, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री एस. विरेश प्रभु, मा. पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण), श्री. प्रकाश जाधव, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (डी-मध्य), श्री.नितीन अलकनुरे यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक इंद्रजित मोरे, सपोनि.अजय बिराजदार, स.पो.नि. गव्हाणे, सफौ. राउत, पोह. तुकाराम सावंत, पोह.उत्तम बोटे, पोह.संदिप कांबळे, पोह.प्रमोद मोरे, पोह. संदिप तळेकर, पोह.अजय बल्लाळ, म.पोह. निखाडे , पो.ना. ज्ञानेश्वर मिंडे , पोशि.अनुपम जगताप, पोशि. सुशिल साळुखे, पो.शि. श्रध्दानंद होटगीकर, पोशि. नानाभाउ रोटे, पोशि.प्रविण चौरे, यांनी पार पाडलेली आहे.
