कोराना विषाणु ओमिक्रॉन व्हेरीयंटच्या अनुषंगाने मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्राकरिता पोलीस उप आयुक्तांचे सिआरपीसी कलम १४४ प्रमाणे मनाई आदेश लागू.

Regional News

जगभरात गेल्या काही दिवसांमध्ये सर्वात वेगाने पसरणारा प्रकार म्हणुन कोराना विषाणुचा ओमिक्रॉन व्हेरीयंट समोर आला आहे. हे यु.एस.ए. आणि युरोप मधील अनेक देशांमध्ये प्रबळ असा प्रकार बनला आहे. येत्या काही दिवसांत राज्यभरात लग्नसराई, इतर सण आणि नविन वर्ष साजरे करण्याच्या पार्श्वभुमीवर नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता निर्माण होऊन कोरोना विषाणुचा ओमिक्रॉन व्हेरीयंट पसरुन संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने त्यास प्रतिबंध बसणेकामी श्री. विजयकांत सागर, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय), मिरा-भाईंदर, वसई-विरार, यांनी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील मिरा-भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्राकरीता फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१) (३) अन्वये दिनांक २५/१२/२०२१ रोजीचे रात्रौ ००.०१ वा. पासुन पुढील आदेशापर्यंत मनाई आदेश लागू केलेले आहेत.

१) बंदीस्त जागेच्या ठिकाणी आयोजित विवाह समारंभास जास्तीत जास्त १०० लोक आणि मोकळया जागेच्या ठिकाणी २५० लोक किंवा उपस्थिती मर्यादेच्या २५ टक्के यापैकी जी मर्यादा कमी असेल इतकेच लोक उपस्थित राहु शकतील.

२) सामाजिक, राजकिय, धार्मिक कार्यक्रम किंवा मेळाव्यात जेथे सर्वसाधारणपणे नागरिकांची सातत्याने उपस्थिती असेल अशा कार्यक्रमाकरिता बंदीस्त सभागृहात जास्तीत जास्त १०० लोक आणि मोकळया जागेच्या ठिकाणी २५० लोक किंवा उपस्थिती क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जी मर्यादा कमी असेल इतकेच लोक उपस्थित राहु शकतील.

३) उपरोक्त नमुद कार्यक्रमां व्यतिरीक्त इतर कार्यक्रमांकरिता उपस्थितांची संख्या बंदिस्त सभागृहाच्या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के पेक्षा जास्त नसावी. खुल्या मैदानात क्षमतेच्या २५ टक्के पेक्षा जास्त नसावी.

४) क्रिडा कार्यक्रम व स्पर्धांकरिता उपस्थित प्रेक्षकांची संख्या त्या ठिकाणच्या आसन क्षमतेच्या २५ टक्के पेक्षा जास्त नसावी.

५) परवानगी/परवाना प्राधिकरणाने घोषित केल्याप्रमाणे उपहारगृहे, स्पा, चित्रपट व नाटयगृहे,व्यायामशाळा या आस्थापना ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील. उपहारगृह मालकांना एकूण आसन क्षमतेविषयी माहिती ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक राहिल. ६) सार्वजनिक ठिकाणी रात्रौ २१:०० ते सकाळी ०६:०० वाजेपावेतो ०५ पेक्षा जास्त इसमांना एकत्र येण्यास मनाई असेल.

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply