कोडेन फॉस्फेट’ हा अंमली पदार्थ मिश्रीत कफ सिरप बाटल्या व Alprazolam Tablets टॅबलेट व्यावसायीक प्रमाणात जवळ बाळगणाऱ्या इसमावर कारवाई.

Crime News Cyber Crime Latest News Political News ताज्या घडामोडी

मिरा-भाईंदर – “अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय यांनी  जि.वलसाड राज्य – गुजरात येथुन वलसाड शहर पोलीस ठाणे हद्दीतुन ‘कोडेन फॉस्फेट’ हा अंमली पदार्थ मिश्रीत कफ सिरप बाटल्या व Alprazolam Tablets I.P. 1.0 mg नावाच्या टॅबलेट व्यावसायीक प्रमाणात जवळ बाळगणाऱ्या इसमावर कारवाई केली आहे. अधिक माहितीनुसार मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी कक्षाकडे अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी गुन्हा नोंद होता त्या पोलिसांनी एका आरोपीस अटक केली होती त्याच्याकडून दिनांक  १८.०९.२०२३ रोजी ‘कोडेन फॉस्फेट’ हा अंमली पदार्थ मिश्रीत कफ सिरपच्या १,५०,०००/- रु. किंमतीच्या ३०० बाटल्या व Alprazolam Tablets I.P. 1.0 mg नावाच्या २,१६,०००/-रु. किंमतीच्या १०,८०० टॅबलेटस् असा एकुण ३,६६,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला होता.

या  आरोपीच्या कब्ज्यात मिळुन आलेला मुद्देमाल हा सदर आरोपीने गुन्हयातील पाहिजे आरोपी रा.वलसाड शहर ता.जि. वलसाड राज्य – गुजरात यांच्याकडून  घेतलेला असल्याचे पोलीस तपासात निष्पण झाले होते. त्या अनुषंगाने पो.उप निरी. संतोष घाडगे व पोलीस पथक हे वरिष्ठांच्या परवानगीने वलसाड शहर ता.जि. वलसाड राज्य – गुजरात परिसरात दि. ०६.१०.२०२३ रोजी रवाना झाले होते. पाहिजे आरोपीच्या मोबाईलचे लोकेशन काढुन तांत्रीक विश्लेषण करुन त्यास  सेठीयानगर, कैलास रोड, वलसाड शहर, या ठिकाणी जावुन  ताब्यात घेतले व  त्याच्या   शॉप नं. ०२, शिवदर्शन बिल्डींग, सेठीयानगर, कैलास रोड, वलसाड शहर या गाळयामधुन पंचांसमक्ष ‘कोडेन फॉस्फेट’ हा अंमली पदार्थ मिश्रीत कफ सिरपच्या ४,८४,०००/- रु. किंमतीच्या ९६९ बाटल्या व Alprazolam Tablets I.P. mg_नावाच्या ३८,६००/-रु. किंमतीच्या १९३० टॅबलेटस् असा एकुण ५,२२,६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांना मिळून आला असून तो जप्त करण्यात आला आहे व या  असुन पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथकामार्फत चालु आहे.

सदरची कारवाई मा.अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), अमोल मांडवे, सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या  मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे प्रभारी पोनि. अमर मराठे, पोउपनि संतोष घाडगे, पोहवा. टक्के, पोहवा.कुडवे, पोहवा. सपकाळ, स.फौ. संतोष चव्हाण, नेम. सायबर सेल यांनी केली आहे.

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply