दिनांक : २९.६. २०२१ रोजी अंमली पदार्थ विरोधी कक्ष यांना गुप्त माहितीदारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली कि , हाटकेश येथील मंगलनगर भाजी मार्केट च्या शेजारी असलेल्या कृष्णा बिल्डींग मधील रूम. नं ३०२ मध्ये काही नायजेरियन नागरिक हे कोकिन नावाचा अंमली पदार्थ स्वतःचे कब्ज्यात बाळगुन विक्री करीत आहे . सदरची मिळालेली बातमी डॉ. श्री. महेश पाटील पोलीस उप आयुक्त (गुन्हे) यांना कळवून त्यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे श्री. रामचंद्र देशमुख , सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे )यांचे नेतृत्वात छापा कारवाई करण्यात आली . सदरच्या कारवाई दरम्यान १००ग्रॅम कोकेन व ६५५ ग्रॅम गांजा नावाचा अंमली पदार्थ नायजेरियन आरोपींच्या जवळ आढळून आला. त्याचप्रमाणे सदरची कारवाई दरम्यान रुम नं . ३०३ येथे ९४१०/- रुपये किंमतीचा अवैधरित्या केलेला मद्यसाठा मिळून आला . मिळून आलेल्या कोकेन ची किंमत आंतररराष्ट्रीय बाजारात २५,००,०००/-रुपये अशी आहे. सदरचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून ३ नायजेरियन आरोपीं वर काशिमीरा पोलीस ठाणे येथे अंमली गुन्हा कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोनि विजय पवार काशिमीरा पोलीस स्टेशन हे करीत आहेत .
सदरची कामगिरी डॉ. श्री. महेश पाटील पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. रामचंद्र देशमुख , सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे ) यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि श्री. जितेंद्र वनकोटि , पोनि श्री. देविदास हंडोरे , सहा. पोलीस निरीक्षक बेंद्रे , पोहवा धनाजी इंगळे , पोना. पवन पाटील , पोशि. विष्णुदेव घरबुडे , मपोशी प्रतिभा जाधव , पोना. विनोद राऊत , पोशि.राजेश श्रीवास्तव नेमणूक गुन्हे शाखा , मिराभाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालय यांनी केले आहे.
