मिरारोड : दिनांक ०५/०७/२०२१ रोजी अंमली पदार्थ विरोधी कक्ष यांना माहिती प्राप्त झाली कि , ‘हाटकेश परिसरामध्ये काही संशयित नायजेरियन व्यक्तींनी कोकेन नावाचा अंमली पदार्थ विक्रीसाठी आणलेला आहे व त्याची विक्री करणार आहेत. सदरची मिळालेली बातमी वरिष्ठाना कळवून वरिष्ठांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे सापळा लावला असता. नेहा बिल्डींग हाटकेश येथून एका नायजेरियन व्यक्तीचे ताब्यातून १२० ग्रॅम व गौरव नमन बिल्डिंग, हाटकेश येथून दुसऱ्या नायजेरियन व्यक्तीचे ताब्यातून ११८ ग्रॅम वजनाचे कोकेन , असे एकूण २३८ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले असून सदर कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारात ३५,७०,०००/- रु. एवढी किंमत आहे . सदरचे मिळून आलेले अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून २ नायजेरियन व्यक्तींना अटक करून त्यांच्याविरुद्ध काशिमीरा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोनि. विजय पवार , काशिमीरा पोलीस स्टेशन हे करीत आहे .
सदरची कामगिरी डॉ. श्री. महेश पाटील , पोलीस उप आयुक्त (गुन्हे ), श्री. रामचंद्र देशमुख , सहा . पोलीस आयुक्त (गुन्हे) , यांचे मार्गदर्शनाखाली पोनि . श्री. देविदास हंडोरे , अंमली पदार्थ विरोधी पथक , पोनि . राहुल राख , मी पो सपोनि . शिंदे , मिरारोड पो. स्टे . पोहवा .इंगळे , पोना. पवन पाटील , विनोद राऊत , पो शि अजय यादव ,ईश्वर पाटील, मपोशि . प्रतिभा जाधव यांनी केली आहे.
