दिनांक 18/08/2021 रोजी कुर्ला टर्मिनस तिकीट बुकींग हॉल मध्ये येथे एक इसम नामे अंकित देवदत्त पांडे, वय – 19 वर्ष, राह – कुर्ला कमानी हा संशयित हालचाली करीत असताना ASI खुमकर, PN येवले व PC शेख हे सकाळी 08/30 चे सुमारास गस्त करीत असताना
त्यांना दिसला असता त्यास ताब्यात घेऊन रिपोर्ट सह पोलिस ठाण्यात PSI दुम्मलवाड यांचेसमोर हजर केले असता त्याची दोन पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांचे अंगझडतीत दोन मोबाईल फोन मिळून आले असता ते सविस्तर जप्ती पंचनाम्याप्रमाने जप्त करुन सदर मोबाईल फोन बाबत त्यांचेकडे सखोल चौकशी करता तो असमाधानकारक व उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला. त्याच्याकडे मिळालेला माल- 1)55000/- रू.कि.एक काळ्या रंगाचा सॅमसंग कं. चा मोबाईल फोन, 2)5000/- रू किमतींचा सॅमसंग कं. चा मोबाईल फोन.
तरी सदर मोबाईल फोन बाबत वपोनि यांचे मार्गदर्शनानुसार PSI दुम्मलवाड, HC शिंदे, PC भराडे, खेताडे यांनी तांत्रिक महितीचे आधारे तपास करुन सदर मोबाईल फोन मालकाचा शोध घेऊन नमुदप्रमाने गुन्हा दाखल करून आरोपीस गुन्ह्यात अटक केली आहे.
