दिनांक ०१/१०२०२० रोजी सुमारे पहाटे १.३० वाजताच्या सुमारास कासा पोलीस ठाणे हद्दीतील मुंबई अहमदाबाद हायवेवरील हॉटेल आकाश येथे ३ इसम जेवणासाठी आले होते. त्याचे जेवण संपल्यानंतर बिल देण्यासाठी बिल काउंटर जवळ आले असता, त्यापैकी एका इसमाने बाहेर जाऊन त्यांची हुडांई आय २० कार मध्ये बसुन पळुन जाण्यासाठी चालु ठेवली. त्यानंतर काउंटर वरील एका व्यक्तीने हॉटेल मॅनेजर/मालक यांना अग्निशस्त्राचा धाक दाखवुन त्यांच्या कडील १,१०,०००/-रुपये रोख रक्कम जबरीने चोरी केली. त्यावेळी मॅनेजर/मालक यांनी आरडाओरड केली असता तेथील ट्रक ड्रायव्हर मदतीला घेवुन पळुन जाण्याच्या तयारीत असणा-या आरोपीच्या गाडीला अटकाव करुन त्याच्या गाडीची चावी काढुन घेतली. त्यावेळी सदर गाडीत असलेल्या आरोपीपैकी एकाके त्याचे जवळील अग्नीशस्त्राने साक्षीदार व फिर्यादी यांच्या दिशेने फायर करुन गाडी सोडुन पळुन गेले. सदर प्रकाराबाबत श्री.दत्तात्रय शिंदे, पोलीस अधीक्षक, पालघर यांना माहिती मिळताक्षणी त्यांनी व श्री.विक्रांत देशमुख, अपर पोलीस अधीक्षक, पालघर विभाग तसेच श्री. विकास नाईक, उपविभागीय पोलीस, पालघर विभाग, श्री.मंदार धर्माधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, डहाणु विभाग, श्री.विश्वास वळवी, उपविभागीय पोलीस अधिकारी, बोईसर विभाग यांचेसह घटनास्थळी जावुन पाहणी केली व तात्काळ जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना पोलीस ठाणे हद्दीत प्रवेश करणा-या व बाहेर जाणा-या ठिकाणी सक्त नाकाबंदीचे आदेश देवुन कोम्बींग ऑपरेशन करुन आरोपी सोडुन गेलेल्या गाडीतील ओळखपत्र व इतर पुराव्याच्या आधारे अवघ्या ४ तासात ३ आरोपी यांना शितापीने ताब्यात घेतले. आरोपींकडे कसुन चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
आरोपी यांच्याविरुध्द कासा पोलीस ठाणे गु.र.नं. ा १६४/२०२० भा.दं.वि.सं.कलम ३९४, ३९७, ३४ सह आर्म अॅक्ट कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास मसपोनि/सिध्दवा जायभावे, प्रभारी अधिकारी, कासा पोलीस ठाणे हे करित आहेत.
सदरची कामगीरी श्री.दत्तात्रय शिंदे, पोलीस अधीक्षक, पालघर यांचे सुचनेप्रमाणे श्री. विक्रांत देशमुख, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांचे मार्गदर्शनाखाली श्री.विकास नाईक, उपविभागीय पोलीस अधिकारी पालघर विभाग, श्री. मंदार धर्माधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, डहाणु विभाग, श्री.विश्वास वळवी, उपविभागीय पोलीस अधिकारी, बोईसर विभाग यांनी व श्री.डी.एस.पाटील, प्रभारी अधिकारी, पालघर, श्री.रविंद्र नाईक, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पालघर, श्री. जितेंद्र ठाकुर, प्रभारी अधिकारी सातपाटी पोलीस ठाणे, मसपोनि/सिध्दवा जायभाये यांनी तसेच इतर अधिकारी अधिकारी कर्मचारी यांनी केली आहे.
