डोंबिवली : डोंबिवली येथून भाडे तत्वावर घेतलेली चारचाकी पळवून नेल्याप्रकरणी आरोपी टोनी पीटर चतीयर वय-35 वर्षे यास विष्णूनगर पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डोंबिवली पश्चिम येथे राहणारे सुरेश ब्रिजमोहन शर्मा यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती . आरोपी याने शर्मा यांच्याकडून हुंडाई कार भाड्याने घेतली होती पण त्याने ती दिलेल्या वेळेत परत न करता त्यांची फसवणूक करून शर्मा यांची कार घेऊन फरार झाला होता. सदर आरोपी विरुद्ध विष्णुनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला .
सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर कोळसेवाडी पोलीस ठाण्यात यापूर्वी कलम 420,406 प्रमाणे गुन्हा दाखल असून अद्याप पावेतो आरोपी फरार होता सदर आरोपी हा वेळोवेळी आपले राहण्याचा ठावठिकाणा बदलत होता. त्यामुळे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पलावा डोंबिवली पूर्व या ठिकाणाहून आरोपीस ताब्यात घेऊन त्यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली.अटक आरोपी याने पोलीस कोठडी दरम्यान गुन्ह्यातअपहरण केलेली कार ही चाळीसगाव जिल्हा जळगाव या ठिकाणी दिलेली असल्याचे सांगितले त्यानुसार विष्णुनगर पोलिस ठाण्याचे पो उपनिरी/कुलदीप मोरे,पोलीस हवालदार/शकील जमादार तसेच पोलीस हवालदार/नाईकरे,पोलीस शिपाई कुंदन भामरे यानी चाळीसगाव जिल्हा जळगाव या ठिकाणी जाऊन गुन्ह्यातील अपहरण केलेली कार जप्त केली असून विष्णुनगर पोलीस ठाणे तसेच कोळसेवाडी पोलीस ठाणे येथील २ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
