नवी मुंबई : दिनांक १२.०४.२०२२ नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा, कक्ष-१ ने मारूती इको कार चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची टोळी अटक करून तमिळनाडू राज्यातून एकुण ५४,00,000/-रू किमतीच्या ०९ मारूती सुझुकी इको कार हस्तगत केल्या आहेत . उस्मान सय्यद व शहानवाज शेख ,अब्दुल सलाम शेख अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्यावर याप्रकारचे अजून १२ गुन्हे दाखल असून त्यांचीही पोलिसांनी उकल केली आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात रबाळे, कोपरखैरणे, खारघर, पनवेल, कामोठे परिसरातून सन २०२१ मध्ये मारुती इको कार चोरीस गेल्या होत्या. तसेच मुंबई आयुक्तालय व ठाणे आयुक्तालय हददीतून देखील मारूती इको कार चोरीस गेल्या होत्या.सदर गुन्हयांचा समांतर तपास करण्याकरीता नमूद गुन्हयाचा घटनास्थळास भेट देवून त्या ठिकाणी उपलब्ध असणा-या तांत्रिक माहितीच्या आधारे तसेच सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे व नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेल्या तांत्रिक माहितीनुसार एका आरोपीचा संपर्क क्रमांक प्राप्त करून त्याचे तांत्रिक विश्लेषण करून, आरोपींनी एकमेकांशी केलेले आर्थिक व्यवहार व सर्व आरोपींचे संपर्क क्रमांक यावरून नमूद गुन्हयात चार आरोपी असल्याचे पोलीस तपासात उघड झाले व एकूण १२ मारुती कार चोरी केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यापैकी एक आरोपी हा ओला कॅब चालक असल्याचे पोलिसांना समजले त्यानंतर गुन्हयातील आरोपी यांना पकडण्यासाठी पोलिसांनी दोन पथके तयार करून तपास केला असता आरोपी उस्मान सय्यद व शहानवाज शेख कुर्ला व पनवेल परिसरातून तसेच अब्दुल सलाम शेख यास जरीमरी झोपडपटटी, कुर्ला परिसरातून दिनांक ६/३/२०२२ रोजी पोलिसांनी अथक प्रयत्न करून अटक केली . आरोपींना अटक केल्यानंतर तीनही अटक आरोपी यांना १४ दिवस रिमांड मध्ये ठेवून त्यांनी चोरी केलेल्या कार तामिळनाडू राज्यामध्ये जावून खाजगी तामिळ दुभाषिक (ट्रान्सलेटर) चेन्नई, कोइंबतूर, वेल्लोर, सेलम, त्रिची, तुतीकोरीन, तिरूचिरापल्ली व मदुराई या भागात सतत १० दिवस तपास करून चोरी केलेल्या एकुण ०९ मारूती इको कार मुंबई पोलिसांनी हस्तगत करून नवी मुंबई आयुक्तालय ०४, मुंबई आयुक्तालय ०६ व ठाणे शहर आयुक्तालय ०२ असे एकूण १२ गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपी यांनी कट रचून सदरचा गुन्हा केला असून आरोपींनी चोरी केलेल्या मारूती इको कार यांचे मूळ आरटीओ क्रमांक, इंजिन नंबर तसेच चेसीस नंबर नष्ट करून कारची मूळ ओळख पटविता येवू नये याकरीता पुरावा नष्ट केल्याचे तसेच बनावट नंबर प्लेटचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. अटक केलेले आरोपी हे मारूती इको कार चोरी करण्यासाठी टेहळणी करून कारचे इंधन लॉक काढून त्याद्वारे कारची डुप्लीकेट चावी बनवायचे व कार चोरी करून तिची नंबर प्लेटमध्ये बदल करून कारच्या बाहेरील ओळखीच्या खुणा नष्ट करायचे. त्यानंतर आरोपी उस्मान सय्यद व शहानवाज शेख हे चोरलेली कार तामिळनाडू राज्यात नेवून आरोपी उस्मान सय्यद हा तेथील त्याचे ओळखीचे कार विक्री करणा-या ब्रोकर यांचे माध्यमातून चोरलेल्या कारची विक्री करत असत.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री.बिपीनकुमार सिंह सो, मा. पोलीस सह आयुक्त, डॉ. श्री जय जाधव सो, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. महेश घुर्ये सो, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे)श्री सुरेश मेंगडे, मा.सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. विनायक वस्त, नवी मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली -गुन्हे शाखा,कक्ष- १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनिल शिंदे,सहा. पोलीस निरीक्षक हर्षल कदम,सहा. पोलीस निरीक्षक आर.एम.तडवी, सहा. पोलीस निरीक्षक निलेश पाटील, पोहवा/ विश्वास पवार, पोहवा/ रोहिदास पाटील, पोहवा/ बालाजी चव्हाण, पोना/ निलेश किंद्रे, पोना/ शशीकांत जगदाळे, पोना/ अजय वाघ, मपोना/दिपाली सांवत, पोना/ दिपक मोरे पोना/ धनाजी भांगरे पोकॉ/ आशिष जाधव, पोकॉ/ विशाल सावरकर, पोकॉ/उत्तरेश्वर जाधव पोकॉ/ अश्विन ठाकूर चालक/सहा. पो.उप.निरीक्षक प्रदीप लिंगाळे चालक/पो.शि./ राकेश भोईर यांनी केली आहे.
