कर्तव्यनिष्ठ व प्रामाणिक पोलीस अमंलदारमुळे महिलेचा हरवलेला मोबाईल मिळाला परत.

Regional News

दिनांक २०/०७/२०२१ : श्री. विजयकांत सागर, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) ,मि.भा .व.वि  हे दिनांक : १८/०७/२०२१ रोजी सांयकाळी ५. ३० वा . चे सुमारास  आयुक्तालय हद्दीत गस्त करीत असतांना त्यांच्यासोबत पो. शि . सुदाम महादु बेलदार हे अंगरक्षक म्हणुन कर्तव्यावर होते. दरम्यान सृष्टी पोलीस चौकी येथे सिग्नल लागल्याने सरकारी वाहन सिग्नलला थांबले असता पो. शि . सुदाम बेलदार यांना रस्त्याच्या बाजूस बेवारस स्थितीत पडलेला एक मोबाईल हॅन्डसेट दृष्टीस पडला .

सदरची बाब त्यांनी श्री. विजयकांत सागर, पोलीस उप आयुक्त यांच्या निदर्शनास आणुन  दिली असता त्यांनी सदर मोबाईलचे मूळ मालकाचा शोध घेवून पुढील कारवाई करण्याबाबत आदेश दिले . त्याप्रमाणे पो. शि . सुदाम बेलदार यांनी मोबाईल ताब्यात घेवून काही माहिती मिळते का बघत असताना सदर मोबाईल वर फोने आल्याने हा मोबाईल श्रीमती. गौरी रामचंद्र पराडकर , रा. मुलूंड यांचा असल्याचे समजले , त्यानंतर श्रीमती. गौरी रामचंद्र पराडकर यांच्याशी सपंर्क साधुन त्यांना वर्सोवा पोलीस चौकीला बोलावून मोबाईलबाबत खातरजमा करून सदरचा मोबाईल हा श्रीमती. गौरी रामचंद्र पराडकर यांना सुपूर्त करण्यात आला.

पो. शि . सुदाम महादु बेलदार यांचे तत्परतेचे व प्रामाणिकपणाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी कौतुक केले .

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply