वसई : कर्जबाजारी झाल्याने मुलीच्या खुनास कारणीभूत ठरुन संपुर्ण परिवारासह आत्महत्येचा प्रयत्न करणा-या दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहीती अशी की, एवरशाईन सिटी, वसई पुर्व या ठीकाणी राहणारे आरोपी १) स्टीफन जोसेफ ब्राको, वय ३७ वर्ष, व २) पुनम रायन ब्राको, वय ३० वर्ष,यांची परिस्थिती बिकट असल्याने त्यांनी कर्ज घेतले होते पण कर्जाची परतफेड करणे त्यांना शक्य न झाल्याने या सर्व परिस्थितीला कंटाळुन त्यांनी आत्महत्या करण्याचे ठरवले त्याप्रमाणे त्यांनी दिनांक २७/०५/२०२२ रोजी मौजे मिरारोड पुर्व येथील सिजन हॉटेलमध्ये रुम बुक करुन खाटनिल किटकनाशक, रॅटोल हे उंदीर मारण्याचे विषारी औषध व कोल्डींक्स बॉटल अशा साहित्याची जमवाजमव करुन त्यांची मुलगी अनायका वय ७ वर्ष हिस किटकनाशक पिण्यास देवुन तिचा खुन केला व आरोपींनी स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.सदर घटनेबाबत काशिमिरा पोलीस ठाणे येथे प्रथम अकस्मात मृत्यु दाखल करण्यात आला होता परंतु पोलीस चौकशी दरम्यान मिळालेल्या पुराव्या नुसार आरोपींनवर दिनांक १/०६/२०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हयातील आरोपी पुनम ब्राको हिने देखील विष प्राशन केलेले असल्याने तिला मिरा भाईंदर महानगरपालीकेच्या हॉस्पीटलमध्ये उपचाराकरीता दाखल करण्यात आले आहे. तसेच गुन्हयातील आरोपी स्टीफन जोसेफ ब्राको हा गुन्हा केल्यानंतर नमुद हॉटेलमधुन निघुन गेला होता. आरोपीचा काशिमिरा पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार तसेच गुन्हे शाखा, युनिट -१ चे अधिकारी व अंमलदारहे शोध घेत असतांना गुन्हे शाखा, युनिट -१ व मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदार यांनी आरोपीबाबत गोपनीय माहिती प्राप्त करुन तसेच तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे आरोपी स्टीफन जोसेफ ब्राको, वय ३७ वर्ष, यास दिनांक ३१/५/२०२२ रोजी ताब्यात घेवून काशिमीरा पोलीस ठाणे येथे पुढिल कारवाईकरिता हजर केले . नमुद आरोपीने देखील विष प्राशन केले असल्याने त्याला देखील हॉस्पीटलमध्ये उपचाराकरीता दाखल करण्यात आले आहे. दोन्ही आरोपींवर उपचार चालु असून त्यांना डिस्चार्ज मिळताच अटक करण्यात येणार आहे.
सदरची कारवाई श्री. डॉ. महेश पाटील पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. अमीत काळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, श्री. विलास सानप, सहा. पोलीस आयुक्त, मिरारोड, श्री अमोल मांडवे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि. श्री संजय हजार, पोनि. विजय पवार, काशिमिरा पोलीस ठाणे, श्री. अविराज कुराडे, पोलीस निरीक्षक गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष १, श्री राहुल राख, पोलीस निरीक्षक मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखा, सपोनि श्री. कैलास टोकले, सपोनि. श्री पुष्पराज सुर्वे, गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष १, सपोनि. श्री नितीन बेंद्रे, सपोनि. श्री दत्तात्रय सरक, सपोनि. श्री अमोल अंबावणे, मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखा, सपोनि/प्रशांत गांगुर्डे- नेम. काशिमिरा पो. स्टे.,सहा.फौ.महादेव वेदपाठक, राजु तांबे, राजु किशोर वाडीले, अर्जुन जाधव, पो.हवा. अविनाश गर्जे, पुष्पेंद्र थापा, संजय शिंदे, संतोष लांडगे, मुस्तकिम पठाण, पो.अंम. प्रशांत विसपुते नेम- गुन्हे शाखा-१ काशिमीरा, पो.हवा विकास यादव, पो.शी सतिष जगताप, महेश वेल्हे, प्रविण पवार नेम-मध्यवर्ती गुन्हे शाखा, पोशि/सुधीर खोत, समीर यादव, सनी सुर्यवंशी, हनुमत थेरवे, स्वप्नील मोहिले, जयकुमार राठोड, निलेश शिंदे नेम-काशिमीरा पोलीस ठाणे यांनी केली आहे.
