विरार : सोन्याची नाणी असल्याचे भासवुन फसवणुक करणा-या आंतरराज्यीय मारवाडी टोळीस दोन कोटी रुपयांसह अटक करण्यात गुन्हे शाखा कक्ष-२, वसई यांना यश.अधिक माहितीनुसार हेमंत मुलचंद वावीया (पटेल), वय ४० वर्षे, धंदा – बांधकाम, रा. डी-२२, पारस कौ. हौ. सोसायटी, डोंबवली (पुर्व) यांना दिनांक १८/०४/२०२२ रोजी ६. ३० वाजण्याच्या सुमारास विरार पोलीस ठाणे हददीत, ऍपेक्स हॉटेल समोर मुंबई-अहमदाबाद हायवे चे बाजुला असलेल्या एका झोपडीमध्ये एक अनोळखी इसमाने कट करुन धातुच्या नाण्यांनी भरलेली पिशवी देवुन सदर पिशवीतील धातुची नाणी ही सोन्याची नाणी आहेत असे भासवुन त्या बदल्यात ३,१२,००,०००/- घेवुन त्यांची फसवणुक केली होती. सदरबाबत विरार पोलीस ठाणे येथे दिनांक ०७/०५/२०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरील फसवणुकीचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे वेगवेगळी पथके तयार करुन, गुप्तबातमीदार यांच्या कडुन माहिती मिळवुन तसेच तांत्रिक विश्लेषन करुन नमुद गुन्हयातील आरोपी १) किसनभाई कस्तुरभाई मारवाडी सलाट, रा. रामदेव नगर, खोडीयार नगर, ता. बडोदा, जिल्हा बडोदा राज्य- गुजरात २) हरीभाई प्रेमाभाई मारवाडी सलाट, रा. खोडीयार नगर,ता. बडोदा, जिल्हा बडोदा ,राज्य- गुजरात ३) मनिष कमलेशभाई शहा, रा. मांझीभाई चेंबर कारेलीबाग, बडोदा, ता. बडोदा, जिल्हा- बडोदा, राज्य- गुजरात यांना दिनांक २१/०७/२०२२ रोजी अटक करण्यात आली असून त्यांना दिनांक २६/७/२०२२ पर्यंत पोलीस कोठडी मंजुर करण्यात आली असून आरोपींकडून गुन्हयातील फसवणुक केलेल्या रकमेपैकी एकुण २,१८,९५,०००/- (दोन कोटी अठरा लाख पंच्यान्नव हजार) रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी श्री. विजयकांत सागर, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय), अति. कार्य. पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. अमोल मांडवे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा-२ वसई युनिटचे पोलीस निरीक्षक श्री. शाहुराज रणवरे, सपोनिरी/ सुहास कांबळे, सागर शिंदे, ज्ञानेश्वर जगताप, पो.हवा/मंगेश चव्हाण, संजय नवले, महेश पागधरे, चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी, पो.ना/ प्रशांतकुमार ठाकुर, पो.शि./अमोल कोरे, दादा आडके, सुधीर नरळे व सायबर सेलचे सहा.फौज/ संतोष चव्हाण यांनी केलेली आहे.
