करोडोचा अंमली पदार्थ तसेच २ गावठी पिस्टल,४ मॅगझिन व १४ जिवंत काडतूसा सह आरोपीस अटक .

Crime News Cyber Crime Latest News Political News ताज्या घडामोडी

भाईंदर – गुन्हे शाखा कक्ष ०१, काशिमिरा मार्फत ७ आरोपीना  अटक करुन एम. डी. – मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ बनविण्याची फॅक्टरी (लॅब) चा शोध घेउन त्यांच्या कडून रुपये ३६,९०,७४,०००/- किं. चा (आंतराष्ट्रीय बाजारभाव प्रमाणे) १८४५३.७ ग्रॅम वजनाचा एम. डी. – मॅफेड्रॉन (त्यापैकी ५००० ग्रॅम ९० टक्के तयार झालेला), रुपये २,७३,९५०/- किं.चे एम. डी. (मॅफेड्रॉन) बनविणे उपयुक्त रसायन ( द्रव्य व पावडर), रुपये २,५९,६९०/- किं.चे एम.डी. (मॅफेड्रॉन) बनविणे उपयुक्त रासायनिक साधन सामुग्री, रुपये ७,८०,०००/- किं.ची वाहने इ. तसेच २ गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र), ४ मॅगझिन व १४ जिवंत काडतूस सह जप्त.अधिक माहितीनुसार दिनांक १८/१०/२०२३ रोजी सपोनि प्रशांत गांगुर्डे, नेमणुक गुन्हे शाखा कक्ष ०१, काशिमिरा यांना त्यांच्या  गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, हॉटेल विन्यासा रेसीडेन्सी, बि.पी. रोड, भाईंदर पूर्व, ता. जि. ठाणे येथे काही इमस ७/८ दिवसांपासून वास्तव्यास असून त्यांच्याकडे अंमली पदार्थ आहेत व ते मिरा-भाईंदर परिसरात अंमली पदार्थाची विक्री करतात तसेच त्यांचेकडे अग्नीशस्त्र असल्याची माहीती पोलिसांना मिळाली. त्याप्रमाणे मा. वरिष्ठांचे आदेश व मार्गदर्शनाप्रमाणे कारवाई करता सनी भरत सालेकर, विशाल सतिश गोडसे, दिपक जितेंद्र दुबे व शहबाज शेवा ई यांच्या ताब्यातुन एकुण २५१.७ ग्रॅम एम.डी., एम.डी. विक्री करुन मिळविलेली रोख रक्कम, एम. डी. विक्री करीता वापरलेली एक मोटार सायकल इ. तसेच सनी सालेकर याच्या  ताब्यातून  एक गावठी पिस्टल मॅगझिन व २ जिवंत राउंडसह पोलिसांनी जप्त केले असून त्याच्याविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पोलिसांनी त्यानंतर केलेल्या तपासामध्ये आरोपी तन्वीर निसार अहमद चौधरी याचेकडून १०२ ग्रॅम एम. डी. (मॅफेड्रॉन), एम.डी. विक्री करुन मिळविलेली रोख रक्कम व एम. डी. विक्री करीता वापरलेली एक चार चाकी वाहन जप्त करण्यात आली  त्यास दिनांक २१/१०/२०२३ रोजी नमुद गुन्हयात अटक करण्यात आली , त्यानंतर आरोपी तन्वीर निसार अहमद चौधरी याने दिलेल्या माहीतीप्रमाणे आरोपीगौतम गुनाधर घोष याचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास दिनांक २१/१०/२०२३ रोजी ,आरोपी गौतम गुनाधर घोष याने दिलेल्या माहीतीप्रमाणे आरोपी समीर चंद्रशेखर पिंजार याने सांगितलेल्या माहिती मध्ये   सर्व्हे नं २६४ / २ / ए, मोखाडा, पालघर येथील जागेत आरोपी समीर चंद्रशेखर पिंजार याने बाधलेल्या घरात एम.डी. (मॅफेड्रॉन) तयार करण्यासाठी बनविलेली लॅब मिळून आली. त्यामध्ये १८१०० ग्रॅम एम. डी. तसेच एम. डी. तयार करण्यासाठी  रसायन, रासायनिक उपकरणे मिळून आली असून  ती जप्त करण्यात  आली आहे व  त्यास दिनांक २२/१०/२०२३ रोजी पोलिसांनी अटक केली , त्याचप्रमाणे आरोपी सनी भरत सालेकर याने केलेल्या निवेदनप्रमाणे रुपये ९,६००/- किं.चे १ गावठी पिस्टल, ३ मॅगझिन व १२ जिवंत काडतुस पोलिसांनी शिताफिने हस्तगत केले आहेत.

सदरची कामगीरी मिरा-भाईदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे मा. श्री. मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, मा. श्री श्रीकांत पाठक, अतिरिक्त पोलीस आयुक्त. मा. श्री. अविनाश अंबुरे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, मा. श्री. अमोल मांडवे, सहा. पोलीस आयुक्त साो., गुन्हे शाखा, यांच्या  मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष १ काशिमीरा येथील पो.नि. अविराज कुराडे, स.पो.नि. कैलास टोकले, स.पो.नि. प्रशांत गांगुर्डे, स.पो.नि. पुष्पराज सुर्वे, सफौ. राजु तांबे, संदीप शिंदे, पो.हवा.संजय शिंदे, संतोष लांडगे, पुष्पेंद्र थापा, विजय गायकवाड, सचिन सावंत, समीर यादव, पो. अं. प्रशांत विसपुते व स.फौ. संतोष चव्हाण (सायबर गुन्हे) यांनी केली असून सदर गुन्हयाचा तपास स. पो. नि. गांगुर्डे करीत आहेत.

 

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply