घाटकोपर : दिनांक ०४/१०/२०२१ रोजी खुन करून फरार झालेल्या १० आरोपीना गुन्हे प्रकटीकरण शाखा, युनिट-७, घाटकोपर यांनी अखेर केली अटक . मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ०४/१०/२०२१ रोजी टेंबीपाडा, भांडुप (प.)कोमल यादव चाळ ते अष्टविनायक डेअरीच्या गल्लीत रामनगर,येथे रात्री ०२.२० ते ०२.३० वा. चे दरम्यान तक्रारदार यांचे ओळखीचे सचिन कुलकर्णी उर्फ चिंग्या वय २४ वर्षे, पियुश नाईक वय १९ वर्षे यांनी त्यांना प्रथम अडवले व सुशील सावंत उर्फ सदा वय २४ वर्षे, उमेश कदम २४ वर्षे व राहुल्या जाधव, वय २१ वर्षे यांनी कोणत्यातरी जुन्या भांडणाचा राग मनात धरून, कट रचुन संगनमताने तक्रारदार यांचा मित्र सुरज गोपाळ मेहरा उर्फ नेपाळी याचा चॉपर व तलवारीच्या सहाय्याने डोक्यावर तसेच पोटात वार करुन त्याचा खुन केला.तसेच तक्रारदार याच्या छातीवर व पोटावर डाव्या बाजूस चॉपरने वार करुन गंभीर जखमी केले म्हणून वर नमुद आरोपी विरूद्ध दिलेल्या तक्रारीवरून भांडूप पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.
भांडूप पोलीस ठाणे येथे वर नमुद गुन्हयाचा समांतर तपास कक्षाकडून करण्यात येत होता. सदर गुन्हयात एका कुविख्यात गॅगस्टरचा सहभाग असल्याचे तांत्रीक तपासाव्दारे निष्पन्न झाल्याने, मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांचे परवानगीने सदर गुन्हा तपासावर घेण्यात आला. दि. २६/११/२०२१ रोजी कक्ष-७ चे पोलीस निरीक्षक सुधीर जाधव, पोउपनि. लोहकरे, रामदास कदम, पो.ना./शिरापुरी, पो.ना. /शिंदे या पोलीस पथकाने ठाणे परिसरातुन ताब्यात घेतले. त्याचा सहभाग निष्पन्न झाल्याने सदर गुन्हयात अटक केले. त्यानंतर तो वापरत असलेल्या ग्लोस्टर मोटार कार मधुन ०१ देशी बनावटीचे पिस्टल व ०४ जिवंत काडतुस पोलिसांनी हस्तगत केले. तसेच नमुद आरोपीने त्याच्या भांडूप येथील घरालगत स्टोर रूममध्ये लपवून ठेवलेले ०१ देशी बनावटीचे पिस्टल व ०४ जिवंत काडतुस काढुन दिल्याने जप्त करण्यात आले. सदर गुन्ह्यातील एकुण ४३,००,०००/- रू.किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.अटक आरोपीं विरूद्ध यापुर्वी खुन, खूनाचा प्रयत्न, खंडणी यासारखे गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्या अटकेने त्याच्या दहशतीखाली वावरत असलेल्या भांडूप तसेच आजूबाजुच्या परिसरातील लोकांनी सुटकेचा नि:स्वास सोडला आहे.
सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस सह आयुक्त(गुन्हे) श्री. मिलींद भारंबे, अपर पोलीस आयुक्त(गुन्हे) श्री. विरेश प्रभु, पोलीस उप-आयुक्त (प्रकटीकरण-१) श्री. निलोत्पल, सहाय्यक पोलीस आयुक्त(डि-पूर्व) श्री. नितीन अलकनुरे, प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. मनिष श्रीधनकर यांचे मार्गदर्शनाखाली महिला पोलीस निरीक्षक प्रिया थोरात, पोलीस निरीक्षक सुधीर जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, पोलीस उप निरीक्षक रामदास कदम, अतिष लोहकरे, पोलीस हवालदार दिपक पवार, राजेंद्र शिंदे, शशीकांत कांबळे, पोलीस नाईक विनोद शिरापुरी, विशाल शिंदे, गौरव सोनवणे, पोलीस शिपाई लुकमान सय्यद, दिपक खरे, विकास होनमाने, यांचेसह पोलीस नाईक चालक संतोष धुमाळ व पोलीस शिपाई चालक चरणसिंग गुसींगे यांनी पार पाडली आहे.
