भाईंदर (दि. १५) : बाल मजुरांकडुन काम करुन घेणाऱ्या कंपनीतील ०३ इसमांना ताब्यात घेवुन ०३ बाल मजुरांची सुटका- अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष भाईंदर यांची कारवाई.अधिक माहितीनुसार दिनांक १४/०७/२०२३ रोजी अनैतिक मानवी प्रतिबंध कक्ष भाईंदर यांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, ज्योती स्टील इन्डस्ट्रियल प्रा. लि. कंपनी, युनीट ०१, ०२ व ०३ मिरा इन्डस्ट्रीयल, कमलेश नगर, काशिमिरा, ता.जि. ठाणे येथे कंपनीचे चालक/मालक, सुपरवायझर व लेबर कॉन्ट्रक्टर हे त्यांच्या कंपनीमध्ये अल्पवयीन मुलांना अनधिकृतपणे कामावर ठेवून त्यांच्याकडून सक्तीने बेकायदेशीरपणे तसेच जिवीला धोका होईल असे काम करुन घेत आहेत.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने अनैतिक मानवी प्रतिबंध कक्ष, भाईंदर पथकाचे पो. नि. श्री. समीर अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. उमेश पाटील यांनी पंचासह ज्योती स्टील इन्डस्ट्रियल प्रा. लि. कंपनी, युनीट ०१, ०२ व ०३ कंपनीमध्ये पंच व पोलीस पथकासह छापा कारवाई केली. त्यावेळी नमुद कंपनीत १४ ते १७ वर्ष वयोगटातील ०३ अल्पवयीन मुले काम करीत असताना पोलिसांना दिसुन आले. त्यांच्या कडुन कंपनीमध्ये अनधिकृतपणे कामावर ठेवून मुलांच्या जिवीतास धोका होईल अश्या पद्धतीने मोठ्या लोखंडी स्टील बार (ब्राईट बार) अॅसीडमध्ये टाकुन त्याची इलेक्ट्रीक मशीनवर कटिंग करुन क्रेनद्वारे ने – आन व लोडींग करण्याचे काम बालमजुरांकडुन सक्तीने बेकायदेशीरपणे धोकादायक काम करीत असतांना आढळुन आले,पोलिसांनी त्यांना सुरक्षिततेसाठी ताब्यात घेतले असुन. सदर बाबत कंपनीचे सुपरवायझर १ ) सुमनकुमार सरगुन मंडल (सुपरवायझर) २) द्विवेदी, (सुपरवायझर), ३) जितेंद्रकुमार रामदौंड मौर्या, (सुपरवायझर), लेबर कॉन्ट्रक्टर मनोज व नमुद कंपनीचे मालक मनोज चड्डा यांच्याविरुध्द स.फौ. विजय चन्नाप्पा निलंगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन काशिमीरा पोलीस ठाणेत गुन्हा बाल व किशोरवयीन (प्रतिबंध) सुधारीत कायदा २०१६ चे कलम ३ (ए), सह बाल न्याय अधिनियम ७५,७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई श्री. अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. अमोल मांडवे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. श्री. समीर अहिरराव, स. फौ. उमेश पाटील, विजय निलंगे, रामचंद्र पाटील, पो.हवा. किशोर पाटील, पो. अंम. चेतनसिंग राजपुत, केशव शिंदे, चा. पो. हवा. सम्राट गावडे, म.पो.अंम. अश्विनी भिलारे, शितल जाधव, म. सु.ब. अश्वीनी वाघमारे, सर्व नेमणुक अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईंदर यांनी केली आहे.
