ऑर्केस्ट्रा बारवर पोलीसांची धडक ; ६ महिलांची केली सुटका

Crime News

भाईंदर पुर्व रेल्वे स्टेशनसमोरील हॉटेल मिड लाईफ ऑर्केस्ट्रा बारमध्ये सिंगर मुलींकडुन नृत्य व अश्लील नृत्य करवुन घेत तसे बारचे व्यवस्थापन त्याना प्रोत्साहन देत असल्याची माहिती अमित काळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१ मिरारोड यांना मिळाली वरुन पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१ यांच्या पथकाने मिडलाईफ ऑर्केस्ट्रा बारमध्ये गाण्याच्या तालावर अश्लिल नृत्य होत असल्याची मोबाईलमध्ये शुटींग प्राप्त केली आणि मिळालेल्या बातमीची खात्री करून छापा घातला

सदर बारमधील मेकअपरुमच्या काचेच्या आरशांच्या संरचनेत बदल करुन काचेच्या आरशाचा दरवाजा बनवून त्याच्या पाठीमागे अरुंद जागेमध्ये सिमेंट भितींच्या संरचनेत बदल छुपी खोली (कॅव्हीटी) बनविली असल्याचे पोलीसांना दिसुन आले. सदर खोलीत वायुविजनासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने छुप्या खोलीत लपविलेल्या मुलींच्या जिवीतास धोका
पोहचण्याची शक्यता गृहीत धरुन मिरा-भाईंदर म.न.पा. अग्निशमन दलाला पाचारण करुन दरवाजा उघडला
असता आतमध्ये ७४ ४.५ फुट लांबी-रुंदीच्या छुप्या खोली (कॅव्हीटी) मध्ये दाटीवाटीने ६ महिलांना लपवीले
असल्याचे दिसुन आल्याने तेथून त्या ६ महिलांची सुटका केली.

हॉटेल मिड लाईफ ऑर्केस्ट्रा बारमधील सिंगर मुलींकडुन नृत्य व अश्लील नृत्य करवुन घेवुन, त्यांचे जिवाची पर्वा न करता त्यांचे जीवीतास धोका होईल असे कॅवीटी मध्ये ठेवुन प्रोत्साहन देणारे बारचे १० स्टुअर्ड/वेटर व व्यवस्थापन व ११ गिहाईकांविरुद्ध नवघर पोलीस ठाणे मध्ये गुरनं. १३१/२०२१ भादंवि कलम ३०८, ३४ सह महाराष्ट्र हॉटेल, उपगृहे आणि मद्यपान कक्ष (बाररुम) यामधील नृत्य व अश्लिल नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत व (त्यामध्ये काम करणाऱ्या) महिलेच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम २०१६ च्या कलम ३, ८ (१) (२) सह कलम ३३(डब्ल्यु) १३१ महाराष्ट्र पोलीस
कायदा सह महाराष्ट्र कोवीड १९ उपाययोजना नियम २०२० चे नियम ११ सह आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५
चे कलम ५१ ब साथ रोग अधीनियम २, ३, ४ प्रमाणे गुन्हा नोंद करुन कार्रवाई केली आहे.

सदरची कारवाई श्री अमित काळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०१ मिरारोड, सपोनि/दत्तुसाहेब
लोंढे, सफौ. विनायक मगर, पोहवा. अजय मांडोळे आणि पथक यांनी केली आहे.

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply