“ऑपरेशन मुस्कान -१०” महाराष्ट्र अंतर्गत ५३ बालकांचा शोध घेण्यात यश – मीरा भाईंदर, वसई -विरार पोलीस आयुक्तालयाची कामगिरी.

Crime News

दिनांक : ९/०७/२०२१  : मा. पोलीस महासंचालक राज्य , मुंबई यांनी “ऑपरेशन मुस्कान -१०” महाराष्ट्र  हि लहान मुलांची शोध मोहीम दिनांक ०१. ०६. २०२१ ते ३०.०६. २०२१ या कालावधीत राबविण्याबाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगाने मिरा भाईंदर, वसई -विरार पोलीस आयुक्तालयमधील हरवलेली किंवा पळवून नेलेल्या बालकांचा शोध घेवून सदरची मोहीम प्रभावीपणे राबवून १८ वर्षांखालील हरवलेली/अपहरित मुलं /मुली यांचा जास्ती जास्त शोध घेण्याबाबत वरिष्ठानी सूचना दिल्या होत्या.

वरिष्ठानी दिलेल्या सुच व मार्गदर्शनानुसार अ. मा. वा. प्रति. कक्ष भाईंदर , नालासोपारा व पोलीस ठाणे निहाय ०१ पोलीस अधिकारी व ०२ पोलीस अंमलदार यांचे विशेष पथक तयार करून दिनांक ०१. ०६. २०२१ ते ३०. ०६. २०२१ या कालावधीमध्ये ऑपरेशन मुस्कान -१०, हि लहान मुलांची शोध मोहीम मीरा भाईंदर, वसई -विरार पोलीस आयुक्तालयामध्ये  प्रभाविपणे राबवून १८ वर्षाखालील १६ मुलं व ३७ मुली असे एकूण ५३ बालकांना ताब्यात घेवून चौकशी अंती सर्व बालकांना त्यांचे पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यामध्ये पोलीस थेने अभिलेखावरील ४३ व १० बेवारस बालकांचा समावेश आहे. त्याचबरोबर एकूण २९४ हरवलेल्या महिलांचा शोध घेण्यात आला.

सदरची मोहीम डॉ . श्री. महेश पाटील, पोलीस उप. आयुक्त (गुन्हे) , श्री. रामचंद्र देशमुख , सहा. पोलीस आयुक्त, (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष भाईंदर , नालासोपारा, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पथक यांनी यशस्वीपणे पार पाडली .

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply