मिरारोड : न्यू गोल्डन नेस्ट येथे वेश्याव्यवसाय करण्याऱ्या महिला वेश्यादलाल हिस अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष, भाईंदर यांनीं दिनांक १०/११/२०२१ रोजी केली अटक. मिरारोड परिसरात राहणारी महिला सपना व तीचा साथीदार विनोद हे मोबाईल द्वारे व्हाट्सऍप वरून गिऱ्हाईकांना मुलींचे फोटो पाठवून नंतर मुलींस वेश्यागमनासाठी मिरा-भाईंदर परिसरातील लॉजमध्ये गिऱ्हाईकास रुम बुक करावयास लावून त्यांच्याकडुन वेश्यागमनाचा मोबदला घेवुन मुली पुरवितात अशी माहिती प्राप्त झाली या बातमीच्या अनुषंगाने श्री. एस. एस. पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष, भाईंदर यांनी बोगस गिऱ्हाईक व पंच यांना जय महल लॉज परिसरात, न्यु गोल्डन नेस्ट, भाईंदर पुर्व या ठिकाणी पाठवून सत्यता पडताळुन पोलीस पथकासह छापा कारवाई करण्यात आली व महिला वेश्या दलाल सपना मुखर्जी हिला रंगेहाथ वेश्यागमनाकरीता स्वीकारलेल्या रक्कमेसह ताब्यात घेवुन ०१ पीडित मुलीची सुटका करण्यात आली. आरोपी सपना मुखर्जी, व तिचा फरार साथीदार विनोद यांच्या विरुध्द नवघर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई श्री. महेश पाटील, पोलीस उप. आयुक्त (गुन्हे), श्री. अमोल मांडवे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष भाईंदर विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील, पो. हवा. उमेश पाटील, रामचंद्र पाटील, पो.ना. गावडे, वैष्णवी यंबर, पो.शि. केशव शिंदे, सुप्रिया तिवले यांनी कामगिरी केली आहे.
