दिनांक:- ०६/०८/२०२१ रोजी दुपारी ०१.०० वाजता माहीती मिळाली की साई व्हिला, शॉप नं.- ०४, स्टेशनरोड, भाईंदर पश्चिम या गाळयात ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली ऑनलाईन जुगार खेळला व खेळवला जात आहे अशी खात्रीशीर बातमी राजु शंकर तांबे, सहा. पोलीस उप-निरीक्षक, नेमणूक गुन्हे शाखा-1, काशिमीरा, यांना मिळाली. संगणक व इंटरनेटच्या माध्यमाने ऑनलाईन स्कीलइंडीया गेमींग नावाचा लॉटरी जुगारावर पैसे लावून जुगार खेळत असतांना ३६,१७० /- रु. किंमतीचे ऑनलाईन जुगाराची साधने व रोख रक्कम सह मिळुन आलेले आहेत. म्हणुन त्याचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर माहीती मिळताच दिनांक ०७/०८/२०२० रोजी दुपारी ०२. १५ वाजता सदर ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता . सदर गाळयामध्ये एक इसम खुर्चीवर बसलेले असुन त्याचे समोरील टेबलवर एक इनबिल्ट कम्प्युटर, एक छोटे प्रिंटर, एक टिकीट स्कनर अशा वस्तु दिसुन आल्या असुन सदर रुमचे भिंतीवर आकडे लिहलेले चार्ट दिसुन येत आहेत.समोर ०२ इसम उभे व ०४ इसम जुगार खेळण्यास बाकडयावर बसलेले दिसुन आले. पोलीसांची ओळख करुन देवून आरोपींना त्याचे नाव व पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नांव 1)बाबुलाल खेमराज डांगे, वय 24 वर्षे रा. नायगांव पुर्व, असे सांगून ती व्यक्ती त्या ठिकाणी कामास असून त्याचे मालक सदरचे ऑनलाईन सेंटर हे लव बर्ड पुर्ण नांव पत्ता माहित नाही असे सांगितले. सदर 4 इसम 1)राजु गणपत जांभळे वय-42 वर्षे, रा. भाईंदर पश्चिम. 2)संजोग नरेश शहा वय-23 वर्षे, भाईंदर पश्चिम 3)वैभव जितेंद्रकुमार शहा वय-34 रा., भाईंदर पश्चिम. 4)कुलदीप मोहनलाल सेठीयार वय-32 वर्षे, भाईंदर पश्चिम.6)विनोद अंबालाल सोलंकी वय-38 वर्षे, रा. नालासोपारा पुर्व. ता. वसई, या गुन्ह्यातील एकूण रुपये 36,170/- इतक्या किमतीचा मुद्देमाल उपस्थित पंचासमक्ष ताब्यात घेवुन त्यावर पोलीसांचे व पंचाचे सहीचे सील करण्यात आले आहे. वर नमुद सहा इसमांना पुढील तपासकामी ताब्यात घेण्यात आले असुन तसा सविस्तर पंचनामा स.पो.निरी. निलेश शेवाळे यांनी केला आहे. सदर व्यक्तीस ताब्यात घेऊन त्याच्यावर व मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक निलेश शेवाळे, पो.उन.निरी. हितेंद्र विचारे, स.फौ. वेदपाठक, राजु शंकर तांबे, सहा. पोलीस उप-निरीक्षक, नेमणूक गुन्हे शाखा-1, काशिमीरा, पो.हवा. संदीप शिंदे यांना पो.निरी. अविराज कुराडे यांनी केली.
