ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारास पोलिसांनी केली अटक.

Crime News Cyber Crime Latest News Political News ताज्या घडामोडी

मिरारोड : ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यास राजस्थान मधुन अटक मांडवी पोलीस ठाणेची कामगीरी मिळालेल्या माहितीनुसार फसवणूक झालेले

फिर्यादी यांनी GOOGLE SERARCH मध्ये HOTEL NEARBY असा सर्च टाकून शोध घेतला असता,  व्हॉटसऍप  वर असलेला मो. क्र. ९५०९८५३१८७ उपलब्ध झाला. नमुद नंबरवर व्हॉटसऍप  वर Hi असा मॅसेज पाठवला असता मो. क्र. ९५०९८५३१८७ वरुन व्हॉटसऍप  कॉल करुन हॉटेल बुकींग करीता मो. क्र. ६३६७४१५३७४ वर ऑनलाईन पेमेन्ट पाठविण्यास सांगण्यात आले. फिर्यादी यांनी ऑनलाईन पेमेन्ट पाठविल्यानंतर त्यांना व्हॉटसऍप  वर https://maps.app.goo.gl/doJf8TqbqQbAHfG76_ _अशी लिंक आली. नमुद लिकवर फिर्यादी गेल्यानंतर त्यांना व्हॉटसऍप  वर  कॉन्फरन्स कॉल करुन आरोपीने UPI PAYMENT APPLICATION आणि IMPSAPPLICATION च्या एकुण 8 ट्रान्झॅक्शव्दारे 88,800/- रुपये इंडिया पोस्ट पेमेन्ट बॅक, बनस्वरा बस स्टॅन्ड जवळ, राज्यस्थान खाते क्र. 044510048676 वर जमा करुन फिर्यादीची आर्थीक फसवणूक केली असल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मांडवी पोलीस ठाणे गुन्हा  दिनांक २२.०५.२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नमुद गुन्हयाच्या तपासात तांत्रीक विष्लेषनाच्या आधारे सदर गुन्हा हा आरोपी १. लक्ष्मराज संजयसिह झाला वय २२ वर्षे, रा. गोपीनाथका गडा, ता. गढी, जि. बांसवाडा, राज्य राज्यस्थान, ( सिम प्रोव्हायडर ) २. सुभाष प्रभुलाल मकवाना वय २१ वर्षे, रा. नयातलाब, पो. पाराहेदा ता. गढी, बांसवाडा, राज्य- राज्यस्थान मो. क्र. 6367415374 चा धारक यांचा सहभाग असल्याने राज्यस्थान बांसवाडा येथे पोलीस पथक पाठवुन आरोपी यांना ताब्यात घेवुन दिनांक ०५/०८/२०२३ रोजी अटक करण्यात आली आहे.

सदर गुन्हाचे तपासामध्ये आरोपींनी उपरोक्त गुन्हयाशिवाय इतर अनेक लोकांची फसवणुक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. लोकांची फसवणुक करण्यासाठी आरोपी 1) 9509853187 2) 6367415374 या  मोबाईल क्रमांक व PAYTM नंबरचा वापरत होते.Transferee UPI Id 1) riyaupdhyay568@okicici 2) 6367415374@paytmयाशिवाय इंडिया पोस्ट पेमेन्ट बॅक, बासवाडा, राज्यस्थान चे खाते क्र. 044510048676 चा वापर करत होते.गुन्हयात अटक आरोपीची दिनांक १०/०८/२०२३ रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड झाली आहे . तरी नमुद एमओबी प्रमाणे वर नमुद मोबाईल नंबर व बॅंक खाते वापरुन आपले फसवणुक केल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हे / तक्रारी अर्ज असल्यास मांडवी पोलीस ठाण्याशी संपर्क करावा.

नमुद गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक, प्रफुल्ल वाघ मांडवी पोलीस ठाणे, मो.क्र. ८८८८८३४१३६ हे करीत आहेत.

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply