भाईंदर : ऑनलाईन एस्कॉर्ट सर्व्हिसेसच्या (अनुरक्षण सेवा ) माध्यमातुन वेश्याव्यवसाय चालवणा-या इसमांवर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष यांनी कारवाई करुन एका पिडीत मुलीची सुटका केली .
अधिकमाहिती नुसार दि.०५.११.२०२२ रोजी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष भाईंदर यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कांदरपाडा, दहिसर पुर्व येथे राहणारा विकी उर्फ विजय यादव व त्याचा साथीदार राहुल उर्फ अलोक रवानी हे इंटनेटवर दिसणा-या जाहिरातीव्दारे गि-हाईकाने मोबाईलवर संपर्क साधला की,आरोपी हा वेश्याव्यवसायासाठी मिरा-भाईंदर परिसरातील लॉजमध्ये रुम बुक करुन किंवा गि-हाईकास लॉजमध्ये रुम बुक करावयास लावून किंवा त्यांच्या सोयीनुसार वेश्यागमनाकरीता मुली पुरवितो.
मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने पोनि समीर अहिरराव यांनी कायदेशीर बाबींची पुर्तता करुन विकी उर्फ विजय यादव याच्या सांगण्यावरून ॲटो रिक्षा चालक सुरेश यादव हा हॉटेल पार्क व्हु, फॅमिली रेस्टॉरंट आणि बारसमोर रस्त्यावर, श्री. लक्ष्मी पार्क, कनकिया रोड, गॅलक्सी हॉस्पीटलजवळ, मिरारोड पुर्व या ठिकाणी पुरुष गि-हाईकास मुलीला पुरविण्यासाठी आला होता त्यावेळी बोगस गि-हाईक व पंच यांना नमुद ठिकाणी पाठवुन सत्यता पडताळुन पोलीस पथकासह दि.०५.११.२०२२ रोजी छापा टाकून कारवाई केली असता रिक्षा चालक सुरेश रामनरेश यादव हा त्याचे रिक्षा मधुन वेश्यागमनाच्या मोबदल्यात पैसे स्विकारुन पुरुष गि-हाईकास मुली पुरवित असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याकडे चौकशी अंती त्याचा साथीदार हा रविकुमार उर्फ छोटु इंदो राम, वय-२३ वर्ष, यास एस.डि. थॉमस स्कुलच्या जवळ असलेली चाळीच्या पहिल्या माळयावर, कांदरपाडा, नयागाव, दहिसर प., मुंबई येथुन ताब्यात घेवुन वेश्यागमनाकरीता स्वीकारलेल्या रक्कम व इतर मुद्देमालासह ताब्यात घेवुन ०१ पिडित महिलेची सुटका करण्यात आली. अटक आरोपी व पाहिजे आरोपी विकी उर्फ विजय यादव व राहुल उर्फ अलोक रवानी यांच्याविरुध्द मिरारोड पोलीस ठाणे येथे गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील कारवाई पोलीस करीत आहेत.
सदरची कामगिरी श्री. विजयकांत सागर, पोलीस उप.आयुक्त, (गुन्हे), श्री. अमोल मांडवे, सहा. पोलीस आयुक्त, (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.श्री. समीर अहिरराव, स.पो.नि. उमेश पाटील, रामचंद्र पाटील, पो.शि. केशव शिंदे, चा.पो.हवा. सम्राट गावडे, म.स.ब. किरण मोरे सर्व नेमणुक अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष- भाईंदर व म.पो.हवा. यादव नेमणुक मनुष्यवध तपास पथक यांनी केली आहे.
