विरार पोलीस ठाणे हद्दीत दाखल ऑटोरिक्षा चोरी व चैन जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणन्याकरीता वपोनि/सुरेश वराडे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोउपनि/संदेश राणे व पथकानी दाखल गुन्हयांचा कौशल्याने तपास करुन ऑटोरिक्षा चोरी व चैन जबरी चोरी करणारे सराईत आरोपी १) चेतन सुरेंद्र विश्वकर्मा, वय २४ वर्षे, रा- कासाव्हिस्टा बिल्डींग, विरार पश्चिम, २) अभिजीत प्रकाश हेजीब, वय १९ वर्षे, रा- आयरेगाव, डोंबिवली पुर्व यांना विरार पोलीस ठाणे. गु.र.नं. १००९/२०२० भादंविस कलम ३९२,३४ मध्ये अटक करुन त्यांचे कडे तपास करुन त्यांचेकडुन एकुण-१० जबरी चोरी व ०९ रिक्षा चोरी असे एकुण १९ गुन्हांची उकल केली असुन, आरोपीकडुन ३,१९,८००/- रुपये किमतीचे सोन्याचे दागीने व ६,००,०००/- रू रूपये किमतीचे ०९ ऑटो रिक्षा असा एकुण ९,१९,८००/- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कामगीरी श्री. प्रशांत वाघुडे, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-३, श्रीमती रेणुका बागड, सहाय्यक पोलीस आयुक्त, विरार पो. ठा.चे वपोनि/श्री. सुरेश वराडे, पोनि/विवेक सोनवणे, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोउपनि/संदेश राणे, पो.हवा./सचिन लोखंडे, पो.ना./सचिन घेरे, पो.ना./ जगदिश मराठे, पोना/विजय दुबळा, आणि पथक यांनी केली आहे.
