वसई : रिक्षा चोरी करणाऱ्या टोळीला वसई पोलिसांनी अटक केली असुन मिळालेल्या माहितीच्या आधारे वासी येथे राहणारे रिक्षा चालक यांनी आपली रिक्षा झेंडा बाझार, कुंभार वाडा, वसई येथे बिल्डींग खाली पार्क केली केली त्यावेळी कुणीतरी अज्ञात इसमांनी त्यांची रिक्षा चोरी केली याबाबत त्यांनी वसई पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती त्यावरून त्या अज्ञात व्यक्ति विरुद्ध गुन्हा दाखल केला होता .
सदरील गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वसई पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक कौशल्याचा वापर करुन गुन्हयातील आरोपी यांचा शोध घेऊन दिनांक ११/०३/२२ रोजी टाकीपाडा, नालासोपारा परीसरात सापळा रचुन आरोपी १) हुसेन आदम शेख, मु/३१ वर्षे यास अटक केली. तसेच सदर आरोपीचा अधिक तपास करून इतर दोन आरोपी २) अब्दुल करीम शेख, मु/३८ वर्षे व ३) महिला आरोपी वय-३६ वर्षे यांना वसई व आचोळे परीसरातुन अटक केली आहे. अटक आरोपी यांचा सखोल तपास करून त्यांच्याकडुन एकुण ३ ऑटो रिक्षा हस्तगत करून वसई व नालासोपारा पोलीस ठाणे हद्दितील एकुण ०३ गुन्हे उघडकीस आणण्यात वसई पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश आले आहे.
सदरची कामगिरी श्री. संजयकुमार पाटील, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-२ वसई, श्री. प्रदिप गिरीधर, सहा. पोलीस आयुक्त, वसई विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली वसई पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कल्याणराव कर्पे, श्री. ऋषिकेश पवळ, पोलीस निरिक्षक (गुन्हे), सपोनि/सुनिल पवार, सपोनि/राम सुरवसे, हेड कॉ./ सुनिल मलावकर, पो.कॉ/ दत्तात्रेय मुंढे, पो.कॉ/ अमोल पाटील, पो.का/०जाधव, पो.का/ भालेराव यांच्या पथकाने केलेली आहे.
