नालासोपारा – दिनांक १५/०३/२०२२ रोजी अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे अंमलदार यांना माहिती प्राप्त झाली कि,नालासोपारा पुर्व, मोरेगांव येथिल मोरेश्वर शाळेजवळ एक नायजेरियन व्यक्ती एम. डी. (अंमली )पदार्थ विक्री करण्यासाठी येणार आहे. सदरील मिळालेलया बातमीच्या आधारे सर्व कायदेशीर बाबींची पुर्तता करुन पोलिसांनी मोरेश्वर शाळेजवळील परिसरात सापळा रचुन नायजेरियन इसम ईबे ईवे ऊर्फ चिमा मोजेस वय ३१, रा. मंगलमुर्ती बिल्डींग जवळ, नालासोपारा (पुर्व), मुळ रा. लागोस, देश नायजेरिया यास ताब्यात घेऊन त्याच्या जवळ असणारा ३५६.९ ग्रॅम वजनाचा ३५,६९,०००/- रुपये किंमतीचा मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ विक्रीकरिता आणला होता तो पोलिसांनी जप्त केला आहे . दरम्यान सदर आरोपीकडून एकुण ३५,८०,०००/- रुपये किं. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्या विरुध्द तुळींज पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयात आरोपीस अटक करण्यात आली असून त्यास दिनांक १९/३/२०२२ पावेतो मा. न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्हयाचा पुढिल तपास तुळींज पोलीस ठाण्याचे अधिकारी करित आहे. सदरील आरोपी नामे ईबे ईवे ऊर्फ चिमा मोजेस याचेविरुध्द यापुर्वी १) विरार पोलीस ठाणे २) सायबर पोलीस ठाणे, गुन्हे शाखा मुंबई असे २ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई डॉ. श्री महेश पाटील, पोलीस उपआयुक्त (गुन्हे), श्री अमोल मांडवे, सहा. पोलीस आयुक्त, (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे पोलीस निरीक्षक श्री. देवीदास हंडोरे, पोहवा. धनाजी इंगळे, पोना पवन पाटील, प्रदीप टक्के, अजय सपकाळ, सुभाष आव्हाड, पोशि. अजय यादव यांनी केली आहे.
