नालासोपारा : तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे श्री. दिपक केशव साईल, वय – ४७ वर्षे,रा. साई निवास अपार्ट. जिजाईनगर, मोरेगाव नालासोपारा (पुर्व), हे दिनांक १७/०७/२०२२ रोजी सकाळी १०.०० चे सुमारास मोरेगाव नाक्याजवळील एस.बी.आय. बँकेचे ए.टी.एम. मध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता त्याठिकाणी अनोळखी व्यक्तींनी “अंकल जरा रूको, ऐसे नही आयेगा पैसा, नेटवर्क स्लो है” असे बोलण्यात गुंतवुन हातचलाखीने त्यांच्याकडील ए.टी.एम. कार्ड बदलून दिले व त्याव्दारे १०,०००/- रूपये रक्कम काढून घेवून त्यांची फसवणूक केली. सदर घटनेबाबत दिपक साईल यांनी दिनांक १७/०७/२०२२ रोजी तुळींज पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाच्या तपासात गुन्हे प्रकटीकरण पथकाने त्वरीत घटनास्थळाची पाहणी करून गुन्हयाच्या घटनास्थळावरुन तांत्रिक पुरावे हस्तगत करुन माहितगाराचे मार्फतीने दोन पुरूष आरोपी यांना निष्पन्न केले व त्यावरुन १) प्रद्युम्न राधेशाम यादव, वय- २२ वर्षे, सध्या रा. रूम नं. १, रघुनाथ कॉलनी, हनुमान मंदिराजवळ, वलईपाडा, नालासोपारा पुर्व ता. वसई, जि. पालघर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एकूण ५० वेगवेगळया बॅकेचे ए.टी.एम. कार्ड जप्त केले व अश्याप्रकारचे ६ गुन्ह्यांची तुळींज पोलिसांनी उकल केली आहे.
सदरची कामगिरी श्री. संजयकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त परि.मंडळ -२, श्री. पंकज शिरसाठ, सहा. पोलीस आयुक्त तुळींज विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तुळींज पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र कांबळे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उप निरीक्षक रामचंद्र शेंडगे, बाळु बांदल, सहा.पो.उप.निरी शिवानंद सुतनासे, पो.हवा.अनिल शिंदे, पो.ना. आनंद मोरे, उमेश वरठा, पो.शि. अशपाक जमादार, छपरीबन यांनी पार पाडली आहे.
